solapur

तीन राज्ये काबीज’ अकलूज मध्ये विजयाचा महा जल्लोष

‘तीन राज्ये काबीज’ अकलूज मध्ये विजयाचा महा जल्लोष

दीदीचा गड भेदल्याचा आनंद सातपुतेनी वाटले लाडू

संचार वृत्त अपडेट 

पश्चिम बंगाल, आसाम व पुदुचेरी या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दणदणीत विजयाचा ‘महाजल्लोष’ आज अकलूज येथील सदभाऊ चौकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

माळशिरस तालुका भाजपच्या वतीने आयोजित या विजयोत्सवाला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.या जल्लोष कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आ.रामभाऊ सातपुते उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये मिळवलेला ऐतिहासिक विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेला विश्वास असल्याचे प्रतिपादन यावेळी सातपुते यांनी केले.सदभाऊ चौकात कार्यकर्ते एकत्र जमले व ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘मोदी है तो मुमकिन है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे,लाढू भरवत, फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा आनंद हालगिच्या गजरात मोठ्या जल्लोषात साजरा केला.


“पश्चिम बंगालसारख्या राज्यात भाजपने घेतलेली आघाडी ही सामान्य कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनतीचे फळ आहे. हा विजय म्हणजे लोकशाहीचा विजय आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे,” अशी भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी ,प्रकाश पाटील,आप्पासाहेब देशमुख,अमरसिंह देशमुख, सुजय माने पाटील,विक्रम माने देशमुख,महादेव कावळे, सचिन शिंदे,निलेश ननवरे,संजय देशमुख,हरि पालवे,नगरसेवक महेश शिंदे,दिपाली वाघमोडे, राहुल लोंढे,जयश्री एकतपुरे, अमित टिळेकर,अमोल माने,संतोष टकले,राजकुमार कुलकर्णी, संतोष वाघमोडे,अशोक गायकवाड आदी मान्यवरा सह भाजपचे तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, युवा मोर्चा, महिला आघाडी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button