solapur

साखरेचे दर वाढले, उसाचे दर का पडले ? अजित बोरकर यांचा सरकारसह कारखानदारांना सवाल

साखरेचे दर वाढले, उसाचे दर का पडले ?

अजित बोरकर यांचा सरकारसह कारखानदारांना सवाल

संचार वृत्त अपडेट  (लक्ष्मीकांत कुरुडकर)

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून साखरेचे घाऊक व किरकोळ दर सतत वाढत आहेत. दीड वर्षात साखरेचे दर ४५ रूपयांच्या पुढे राहून आज ७० रूपयांवर गेले. ऊस हा सध्या कल्पवृक्ष असून, उसापासून इथेनॉल, स्पिरिट देशी-विदेशी दारू, वीज असे अनेक उपपदार्थ तयार होतात व त्याचेही दर वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत उसाचे दर का पडले आहेत? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित बोरकर यांनी सरकारसह कारखानदारांना केला.सहकारी व खाजगी साखर कारखाने वाढलेल्या बाजार भावाप्रमाणे साखर विकत आहेत. ही सर्व साखर गेल्या हंगामातील असून त्याचा उत्पादनाचा खर्च कमी आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना या साखर विक्रीवर अधिक फायदा मिळणार आहे. या फायद्यातील काही भाग ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या हंगामात पुरवलेल्या उसावर देणार आहात काय ? साखर कारखान्याने गेल्या हंगामातील किती टन साखर सरकारी गोदामात शिल्लक आहे ? गेल्या वर्षभरात दर महिन्याला साखर काय दराने व किती विकली याची माहिती ऊसकरी शेतकरी व सभासदांना द्यावी.कारखान्यानचे चेअरमन व संचालक मंडळ मालामाल होणार व ऊसकरी शेतकरी उपाशी राहणार. सर्व आमदार, खासदार, मंत्री, शेतकऱ्यांचा खोटा कळवळा दाखवतात पण प्रत्यक्ष कृती उलटी करतात. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांनी यात लक्ष घालावे व वाढीव साखरेच्या दराचा फायदा शेतकऱ्यांना करून द्यावा. या दरवाढ मागणीबाबत गावागावात चर्चा सुरू आहे. जर ऊसकरी शेतकऱ्याला वाढीव दर मिळाला नाही तर शेतकरी लढा उभारतील याचीही नोंद साखर कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ,मालक व शासनाने घ्यावी असेही ते शेवटी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button