अकलूजच्या महिला नेतृत्वाला बळ ; निलिमाताई पवार यांच्याकडे शहर अध्यक्षपद

अकलूजच्या महिला नेतृत्वाला बळ ; निलिमाताई पवार यांच्याकडे शहर अध्यक्षपद
संचार वृत्त अपडेट
गोरगरीब व वंचित घटकांना न्याय मिळवून देणाऱ्या ‘सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघा’च्या अकलूज शहर महिला अध्यक्षपदी निलिमाताई पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष राजेशभाई कुंभारे (नागपूर), पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने,आणि प्रदेश अध्यक्ष किशोर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाली.
निवडीनंतर निलिमा पवार म्हणाल्या,“जिल्हा अध्यक्षा शुभांगी मोरे, तालुका अध्यक्षा अश्विनी पांढरे व उपाध्यक्षा वंदना तिकुठे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी लढणार. संघटनेची ताकद वाढवणे हेच माझे ध्येय आहे.पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांच्या नेतृत्वाखाली महिलांवरील अन्यायाविरुद्ध संघाचे काम सुरू असून, या निवडीमुळे महिला संघटनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.



