solapur

अकलूज कचरा डेपोचा निर्णय अगोदरच ; न.प.ने निर्णय घेतल्यावर भाजपला जाग जनतेच्या आरोग्याचा मुद्दा ; महादेव कावळे 

अकलूज कचरा डेपोचा निर्णय अगोदरच ; न.प.ने निर्णय घेतल्यावर भाजपला जाग

जनतेच्या आरोग्याचा मुद्दा ; महादेव कावळे 

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

ग्रामदैवत अकलाई देवी परिसर आणि नीरा नदीपात्राच्या स्वच्छतेबाबत अकलूज नगरपरिषदेने आधीच अधिकृत आणि वैधानिक निर्णय घेऊन काम मार्गी लावलेले असताना, आयत्या पिठावर रेघोट्या मारत भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेली राजकीय स्टंटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. असा घणाघात सत्ताधारी गटाकडून करण्यात आला आहे.
प्रत्यक्षात नगरपरिषदेने हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळला होता.दि. २५ ऑगस्ट २०२६ च्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. ३ अन्वये कचरा डेपोसाठी खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा ठराव अधिकृत विषयपत्रिकेवर ठेवण्यात आला होता. त्या दिवशी महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ च्या कलम ८१(९) नुसार आवश्यक गणपूर्तीअभावी नगराध्यक्षा  रेश्मा अडगळे यांनी सभा तहकूब केली होती आणि दि. ३१ ऑगस्ट २०२६ च्या तहकूब सभेत हाच ठराव सर्वानुमते मंजूर करून घेतला.
सत्ताधाऱ्यांनी घनकचऱ्याच्या गंभीर समस्येवर कायदेशीर तोडगा काढून शहराच्या हिताचा निर्णय आधीच पदरात पाडून घेतल्यानंतर, भाजपच्या मंडळींना अचानक अकलाई देवीच्या परिसराचा पुळका आला. त्यांनी समाजमाध्यमांवर कचऱ्याचे व्हिडिओ व्हायरल करत नगरपरिषद काहीच करत नसल्याचे बकवास चित्र रंगवण्यास सुरुवात केली, असा आरोप होत आहे.
जनतेच्या प्रश्नांचा पुळका नसून नगरपरिषदेच्या कामाचे फुकट श्रेय लाटण्यासाठी केलेली निव्वळ आणि उशिराची राजकीय नौटंकी आहे, सध्या शहरात भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा आणि दर्जेदार सिमेंट रस्त्यांची कोट्यवधींची कामे वेगाने सुरू असताना, त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून संपूर्ण शहराला बदनाम करण्याचा हा भाजपचा  डाव आहे केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे, जिल्ह्याला पालकमंत्रीही भाजपचाच लाभला आहे; मग या पदाधिकाऱ्यांनी गेल्या १२ ते १४ वर्षांत अकलूजसाठी नेमके काय दिवे लावले? याचा हिशोब कागदपत्रांसह जनतेसमोर ठेवून दाखवावा, असे  आव्हान आता भाजपला देण्यात आले आहे.
सत्ताधाऱ्यांनी कागदावर निर्णय घेऊन प्रत्यक्षात काम केल्यावर, तोंडावर कॅमेरे धरून पोकळ भाषणे ठोकता, ही कसली लोकसेवा? अकलूजची जनता दूधखुळी नाही; कोण घाम गाळून काम करतोय आणि कोण उकिरड्यावर उभे राहून रील्स बनवून श्रेय लाटतोय, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे असल्या छुप्या राजकीय स्टंटबाजीने अकलूजकरांची दिशाभूल करण्याचे उद्योग भाजपने त्वरित थांबवावेत,” असा इशारा सत्ताधारी गटाकडून देण्यात आला आहे.

जनतेच्या आरोग्याचा मुद्दा
२ तास त्या धुरामध्ये बसून दाखवा !

 अकलाई घनकचरा डेपोच्या मुद्द्यावरून अकलूज नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी भाजपवर केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे, तथ्यहीन आणि राजकीय द्वेषातून केलेले आहेत,अकलाई घनकचरा डेपो हलवण्याची मागणी ही आजची नाही. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी यासाठी सातत्याने निवेदने, आंदोलने केली आहेत. दि. ३१/०८/२०२६ रोजी झालेला डेपो हलवण्याचा ठराव हा या दीर्घकालीन लढ्याचे यश आहे. यात भाजपची कोणतीही स्टंटबाजी नाही, तर ठवरे प्लॉट व अकलाई परिसरातील हजारो रहिवाशांची त्या विषारी धुरापासून आणि दुर्गंधीपासून सुटका करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश आहे. जे आज आमच्यावर स्टंटबाजीचे बिनबुडाचे आरोप करत आहेत, त्यांनी एकदा अकलाई घनकचरा डम्पिंग ग्राउंडजवळ जाऊन जिथे कचरा जळतो. त्या धुरामध्ये खुर्ची टाकून किमान दोन तास बसून दाखवावे! म्हणजे त्यांना कळेल की ते अकलूजकर जनतेच्या आरोग्याशी कसा जीवघेणा खेळ मांडत आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या परिसरातील नागरिकांची कशी फसवणूक करत आहेत.

महादेव कावळे (शहराध्यक्ष,भाजप )

महामदेव<span;>महादेव कावळे ( अकलूज शहराध्यक्ष भाजप ) कावळे ( अकलूज शहराध्यक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button