solapur

एक सामाजिक संकल्प,गोरेंच्या वाढदिवसानिमित्त ५०१ रक्तदात्यांचे लक्ष्य !!

एक सामाजिक संकल्प,गोरेंच्या वाढदिवसानिमित्त ५०१ रक्तदात्यांचे लक्ष्य !

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज शहर भारतीय जनता पार्टी व महादेव कावळे मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या उपस्थितीत जुने पोलीस स्टेशन समोर,अकलूज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात ५०१ रक्तदात्यांचे रक्तदान घडवून आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर रोजी होत आहे. वाढदिवस म्हटला की केक, शुभेच्छांचे बॅनर आणि सत्कार असा नेहमीचा कार्यक्रम पाहायला मिळतो. मात्र, यंदा त्याला सामाजिक सेवेची जोड देत ‘वाढदिवसाची खरी भेट म्हणजे एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी दिलेले रक्तदान’ या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या रक्तदान शिबिरासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा मोर्चाचे कार्यकर्ते तसेच अकलूज शहरातील नागरिक, तरुण-तरुणी आणि विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी होणार आहेत. नियोजनानुसार ५०१ रक्तदात्यांचे रक्त संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे.वाढदिवसाचा हा सामाजिक उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित न ठेवता रुग्णालयात गरजू रुग्णांना फळांचे वाटप तसेच वृक्षारोपणाचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्यसेवा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी अशा तिन्ही गोष्टींचा संगम साधला जाणार आहे.रक्तदानातून संकलित होणाऱ्या रक्ताचा उपयोग गरजू रुग्ण, अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण तसेच नियमित रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी होणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमासाठी अकलूज शहर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते नियोजनबद्ध पद्धतीने तयारीला लागले असून, ५०१ रक्तदात्यांचे लक्ष्य प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ‘रक्तदानाची चळवळ’ उभी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

• मोठ्या संख्येने सहभागी व्हावे 

पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाच्या उपयोगी पडेल असा उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. केवळ केक कापून किंवा शुभेच्छांचे बॅनर लावून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा रक्तदान करून एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचविण्यास हातभार लावणे हीच वाढदिवसाची खरी भेट आहे. यंदा ५०१ रक्तदात्यांचे लक्ष्य ठेवले असून अकलूजकरांच्या सहकार्याने ते निश्चितपणे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

महादेव कावळे,भाजप,अकलूज शहराध्यक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button