solapur

ऊसदराच्या आंदोलनाला कायद्याच्या जाणकारांचे बळ; माळशिरस वकील संघटनेचा राजू शेट्टींना पाठिंबा

ऊसदराच्या आंदोलनाला कायद्याच्या जाणकारांचे बळ; माळशिरस वकील संघटनेचा राजू शेट्टींना पाठिंबा

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊसदराच्या आंदोलनाला आता विविध क्षेत्रांतून पाठिंबा मिळू लागला असून, या शेतकरी आंदोलनाला माळशिरस वकील संघटनेनेही जाहीर पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ऊसदराच्या लढ्याला माळशिरस वकील संघटनेने आपला ठाम पाठिंबा दर्शविला आहे.यासंदर्भात माळशिरस वकील संघटनेच्या वतीने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी राजू शेट्टी यांना लेखी पत्र देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनास आपला आणि आपल्या संघटनेचा पाठिंबा असल्याचे या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, त्यांच्या घामाला आणि कष्टाला न्याय मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माळशिरस तालुक्यातील वकील संघटनेने पाठिंबा दिल्याने शेतकरी आंदोलनाला बळ मिळाले आहे.माळशिरस वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सत्यजित केशवराव गलांडे, सचिव अ‍ॅड. दत्तात्रय शंकर आडत अँड.विशाल पाटील तसेच उपाध्यक्ष, सहसचिव व खजिनदार   यांच्या माध्यमातून संघटनेने हा पाठिंबा व्यक्त केला आहे.
ऊसदराच्या प्रश्नावर सुरू असलेल्या शेतकरी लढ्याला वकिलांची साथ मिळाल्याने आंदोलनाला नवी ताकद मिळणार असून, या पाठिंब्याची तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button