अबुबकर तांबोळी यांच्या मातोश्री ताहेरा हाजी अ.कादिर तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन

अबुबकर तांबोळी यांच्या मातोश्री ताहेरा हाजी अ.कादिर तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथील ताहेरा फाउंडेशन अकलूजचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांच्या मातोश्री हाजानी माॅ ताहेरा हाजी अ. कादिर तांबोळी यांचे आज रात्री अल्पशा अजाराने दुःखद निधन झाले.हाजी अ.कादरभाई यांनी आपल्या सहकाऱ्यां मदतीने बज्मे अन्वारे सुफिया मदरसा अकलूज च्या स्थापने पासून मदरशातील महेमाने रसुल-विद्यार्थ्यांची सेवा करताना हाजानी माॅ ताहेराबी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले होते.हाजी अ.कादरभाई यांच्या पश्चात त्यांचे जेष्ठ चि.हाजी.अबुबकरभाई तांबोळी यांनी गरजवंताना मदतीचा हात देण्यासाठी आई च्या नावे ताहेरा फाऊंडेशन ची सुरूवात केली.अनेक समाज उपयोगी कामे त्यांच्या समोर झाल्याने हाजानी माॅ यांना कृतार्थ वाटत होते.फाऊंडेशन च्या उपक्रमात त्या आनंदाने सहभागी होत आपल्या हाताने गरजवंताना मदत करत होत्या.हाजी अबुबकरभाई तांबोळी यांनी त्यांच्या नावे ताहेरा फाऊंडेशन सुरू केल्याचा आनंद नेहमी त्यांच्या चेहर्यावर जाणवत होता.त्यातुन त्या खूप समाधानीही होत्या.परंतु वयाच्या आंतिम पाडावात अल्पशा अजाराने काल त्यांचे दुखःद निधन झाले.त्यांच्या पश्चात हाजी अबुबकरभाई,हाजी असलमभाई तसेच सुना नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या अंतिम विधीत अकलूज परिसरातील अनेक मान्यवर व समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.