अभिजीत पाटलांचा माढा विधानसभा मतदारसंघात संपर्क अभियान सुरू
अभिजित पाटलांचा माढा विधानसभा मतदारसंघात संपर्क अभियान सुरू
संचार वृत्त
बी.टी.शिवशरण ज्येष्ठ पत्रकार
श्रीपूर —महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे त्यामुळे कोणता विधानसभा मतदारसंघ आपल्याला सोयीचा व उमेदवारी कोणाकडून मिळते याचे राजकीय ठोकताळे बांधले जात आहेत पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे या वेळी माढा विधानसभा निवडणुक आखाड्यात लंगोट लाऊन दंड थोपटून पुढे सरसावले आहेत लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे पण या वेळी माढा विधानसभेला ते भाजपकडून इच्छुक आहेत की अन्य पक्षाकडून हे अद्याप स्पष्ट नसल्याने त्यांनी गावभेट कार्यकर्ते संपर्क चर्चा संवाद सुरू केल्यानं ते माढयातून निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे गेल्या आठवड्यात श्रीपूर मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम व पैठणीचा खेळ कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला महाळुंग श्रीपूर बोरगाव माळखांबी मिरे नेवरे जांबूड पंचक्रोशीतील महिलांनी प्रचंड गर्दी केली होती तसेच कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती अभिजित पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे या भागात मोठे नेटवर्क सुरू केले आहे या भागात नवीन राजकीय नेता उदयाला येत आहे त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत कशी असू शकेल याची उत्सुकता वाढली आहे या पार्श्वभूमीवर माढा विधानसभा निवडणूक यावेळी चौरंगी नव्हे पंचरंगी होईल असे चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाणं वाजणार असल्याने अनेक राजकीय नेते आपल्या मुळ पक्षातून शरद पवार यांचेकडे जाण्यासाठी धडपडत आहेत सध्या ते तळ्यात मळ्यात आहेत कोणता पक्ष आपल्याला अधिकृत उमेदवारी देतोय याची चाचपणी सुरू आहे अभिजित पाटील यांची माढा विधानसभा निवडणुकीत एन्ट्री ही प्रस्थापित नेत्यांना धडकी भरवते आहे त्यामुळे यंदाची माढा विधानसभा निवडणूक अत्यंत अटीतटीची व चुरशीची होणार हे आतापासूनच उत्कंठा शिगेला वाढवणारी होणार आहे हे नक्की