solapur

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जागा वाटप अधिकार राम सातपुते यांना तर मग मोहिते पाटील यांच्या भुमिकेकडे जनतेचे लक्ष

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जागा वाटप अधिकार राम सातपुते यांना तर मग मोहिते पाटील यांच्या भुमिकेकडे जनतेचे लक्ष

संचार वृत्त अपडेट 

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरस तालुका माजी आमदार रामभाऊ सातपुते यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सर्व अधिकार दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे मोहिते पाटील यांचे समर्थक यांच्यात खळबळ माजली आहे एकीकडे माजी आमदार रामभाऊ सातपुते व मोहिते पाटील यांचे मध्ये राजकीय विळया भोपळ्याचे संबंध आहेत तसेच लोकसभा निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वगळता संपूर्ण मोहिते पाटील परिवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी मध्ये सक्रिय राहून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी चे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडुन आणले आहे त्यामुळे हे शल्य भाजप विसरू शकत नाही गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे गाळप शुभारंभ कार्यक्रमात जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील यांनी अचानक एक राजकीय बॉम्ब टाकला आहे की येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आम्ही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मोहिते पाटील यांचे राजकीय डावपेच कधी काय खेळले जातील हे समजत नाही मात्र मोहिते पाटील यांचे या भुमिकेने भाजप सावध झाले आहे मोहिते पाटील यांची राजकीय संधीसाधू भुमिका न ओळखण्या इतकी भाजप दुधखुळी राहिली नाही अशी चर्चा जनतेतून व भाजपच्या गोटातून ऐकायला मिळत आहे.मोहिते पाटील विरोधक यांनी सर्व प्रकार भाजपचे वरिष्ठ पातळीवरील हायकमांडच्या लक्षात आणून दिले आहे त्यामुळे बाळदादा काय भुमिका घेतात व भाजपचे काम कशा पध्दतीने करतात याकडे अजिबात लक्ष न देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून भाजपच्या सुत्रांनी माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जागा वाट वाटपाचे सर्व अधिकार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांना दिल्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केल्याने मोहिते पाटील गट सपशेल तोंडावर आपटला आहे अशी वस्तुस्थिती आहे या सर्व पार्श्वभूमीवर व घडामोडींवर मोहिते पाटील यांचे घरातील चार ते पाच भावंडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भेटिला गेल्याचे माध्यमातून समजते आहे गेल्या पाच दिवसांपासून त्यांना मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली की नाही किंवा याबाबत दोघांत काय चर्चा निर्णय झाला हे अद्याप स्पष्ट बाहेर आलेले नाही मात्र या सर्व घडामोडींवर जर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राम सातपुते यांना सर्व अधिकार भाजपने दिले आहेत तर मग माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील आता काय भुमिका घेतात याकडे संपूर्ण सोलापूर जिल्हा नव्हे महाराष्ट्रातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button