solapur

वीर साम्राज्य ग्रुपतर्फे पंचवटी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप  

वीर साम्राज्य ग्रुपतर्फे पंचवटी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

संचार वृत्त अपडेट 

अकलूज (ता. माळशिरस):
“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे गीत गावे…”
या प्रेरणादायी ओळींचा अनुसर करत वीर साम्राज्य या सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथील माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पंचवटी येथील नव्याने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाच्या स्कूल बॅग्स (सॅक)प्रा. विशाल साळुंखे सर लिखित इंग्रजी व्याकरणाची दर्जेदार पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली.उद्दिष्ट हेच की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण साहित्य मिळावे आणि शिकताना न्यूनगंड वाटू नये.या कार्यक्रमास वीर साम्राज्य ग्रुपचे सदस्य – विजय एकतपुरे, अभिजीत रणवरे, प्रदीप पगारे, आदित्य आर्वे, सोमनाथ कथले, मंगेश देशमुख, स्वप्निल शहाणे उपस्थित होते.या वेळी अकलूज केंद्राचे केंद्रप्रमुख मा. प्रभाकर ननवरे सर, व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुमालिया काझी मॅडम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कौतुक केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक सुहास उरवणे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आदर्श शिक्षिका लता निंबाळकर मॅडम यांनी केले.केंद्रप्रमुख ननवरे सरांनी वीर साम्राज्य ग्रुपच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.विजय एकतपुरे सरांनी आपल्या मनोगतातून वीर साम्राज्य ग्रुपच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.शाळेच्या वतीने वीर साम्राज्य ग्रुप व प्रा. विशाल साळुंखे सर यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button