मोहिते पाटील यांच्या तिस-या पिढीने घेतला लालूभाईच्या वडापावचा आस्वाद

मोहिते पाटील यांच्या तिस-या पिढीने घेतला लालूभाईच्या वडापावचा आस्वाद
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर— (केदार लोहकरे)
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या गाळामधील लालूभाई शेख यांचा गेली तीस दशकांपासून वडापावाचा व्यवसाय सुरू आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी ही शिक्षणाबरोबर लालूभाईच्या वडापावाचा आस्वाद घेत आसतात.त्यामुळे या वडापावाची प्रसिद्धी तालुक्यातील गावागावामधून झाली आहे.आज युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी या वडापावचा आस्वाद घेतला. त्यांच्या व्यवसायाचे कौतुक केली.
तीस वर्षांपूर्वी लालूभाई शेख यांचे वडील करीम शेख यांनी छोट्याशा पत्राच्या गाळ्यामध्ये (टपरीत) वडापावाचे दुकान सुरू केला होते.त्या नंतर लालूभाई यांनी हा व्यवसाय पुढे सुरू ठेवला आहे.आता त्यांचा मुलगाने वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालू ठेवला आहे.त्यामुळे वडापावच्या या व्यवसायात तिसरी पिढी ही सक्रिय झाली आहे. लालूभाई यांचा मुलगा अरबाज शेख याने उच्च शिक्षण घेऊन तो नोकरीच्या मागे न लागता आपल्या आजोबा व वडीलांचा व्यवसाय पुढे चालू ठेवला आहे.व्यवसाय कोणता ही असो तो आपल्यातील जिद्द व चिकाटीच्या जोरावर टिकवता येतो हे शेख कुटुंबानी दाखवून दिले आहे.