शोभा वाघमोडे यांनी बंदी जणांना राख्या बांधून अवगुण सोडून देण्याचे केले आव्हान
शोभा वाघमोडे यांनी बंदी जणांना राख्या बांधून अवगुण सोडून देण्याचे केले आवाहन.
या भावनिक क्षणी सर्वांच्या डोळ्यातून अश्रू
संग्रामनगर (संजय लोहकरे यांजकडून)
रक्षाबंधन हा सण भाऊ- बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे.या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करते.संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना.माळशिरस येथील पत्रकार शोभा वाघमोडे यांनी या पवित्र दिवसाचे औचित्य साधून त्यांनी ६० बंदी जणांना राख्या बांधून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली व अवगुण सोडून देण्याचे आवाहन केले.यावेळी अनेक बंदी जणांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते.अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.यावेळी बहिणीने आपल्या भावांना ओवाळणीबद्दल अवगुण सोडून देण्याचे आवाहन केले.तसेच अनेक शासकीय अधिकारी आपल्या कर्तव्यामुळे आपल्या बहिणीकडे जाता येत नसल्याने अधिकारी,कर्मचारी, माजी सैनिक,माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व सर्व पोलीस स्टाफ या सर्वांना तसेच माळशिरस तहसीलदार यांच्या परवानगी जेलर यांच्या समक्ष राख्या बांधून अनोखा रक्षाबंधन सण साजरा केला.