बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान बक्षीस वितरण सोहळा संपन्न
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान बक्षीस वितरण सोहळा संपन्न
अकलूज एसटी आगाराने ब गटामधून प्रथम क्रमांक पटकावला.
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)चालू वर्षी मे २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये हिंदूहृदय सम्राट स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबविण्यात आले होते.सदर अभियान हे आपलं गांव आपलं बस स्थानक या संकल्पनेवर आधारीत होतं. या अभियानामध्ये बस स्थानकावरील येणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यांच्या संख्येच्या आधारे अ,ब आणि क यामध्ये वर्गीकरण करण्यात आले होते.त्यानुसार अकलूज आगार हे ब वर्गात येत होते.अभियाना दरम्यान अकलूज शहरातील विविध व्यापारी वर्गाने, सामाजिक संघटनांनी,नामवंत डॉक्टर यांनी भरभरून प्रतिसाद देऊन बस स्थानक सुशोभित केले.त्यामुळे अकलूज बस स्थानकाचा ब वर्गामध्ये प्रथम क्रमांक आला.
या अभियानाच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम सातारा येथे पुणे प्रदेश प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती यमिनी जोशी मॅडम व मुंबई प्रदेश प्रादेशिक व्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षिसामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी,बक्षिसाचा पाच लाख रक्कमेचा चेक व प्रशस्तीपत्र देण्यात आले.हे बक्षिस घेण्यासाठी सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक सुनिल भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील,यंत्र अभियंता श्री.चव्हाण,विभागीय अभियंता श्री चौधरी,अकलूज आगाराचे आगार व्यवस्थापक श्री.प्रमोद शिंदे,वरिष्ठ लिपिक उदय दुपडे व सेवानिवृत्त कर्मचारी उत्तम भोसले हे उपस्थित होते.
बक्षिसामध्ये मिळालेल्या ट्रॉफीच्या स्वागतासाठी अकलूज आगारातील चालक,वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी वाजंत्र्यासह उपस्थित होते. मोठ्या उत्साहाने अकलूजमध्ये या ट्रॉफीचे भव्य स्वागत आगारामध्ये करण्यात आले.
या मिळालेल्या बक्षिसासाठी अकलूजमधील सर्व दानशूर व्यापारीवर्ग,उद्योजक,वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर,शाळा महाविद्यालये व आगारातील कर्मचारी वर्ग यांची मोलाची साथ मिळाली.त्यामुळे अकलूज बस स्थानकाचे नाव हे प्रथम क्रमांकाचे बस स्थानक म्हनून नावारूपाला आले.
प्रमोद रघुनाथ शिंदे
आगार व्यवस्थापक,अकलूज.