वादग्रस्त विधान करून शांतता बिघडवणारे नेते, कार्यकर्त्यावर स्थानिक पोलीस प्रशासन प्रशासनाकडून कारवाई का होत नाही
एकमेकांवर वादग्रस्त विधान करून सामाजिक शांतता बिघडवणारे नेत्यांवर कार्यकर्त्यांवर स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही
संचार वृत्त
श्रीपुर(बी.टी.शिवशरण ज्येष्ठ पत्रकार)गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय वातावरण कमालीचे गढुळ व दुषीत झाल्याने येथील शांततेला तडे जाऊ लागले आहेत त्यामुळे सामाजिक सुसंस्कृत वैचारिक सभ्यतेचा स्तर घसरला आहे या पार्श्वभूमीवर सामान्य जनता राजकीय जाणकार लोक भयभीत झाले आहेत अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे प्रश्न असा आहे की स्थानिक पातळीवर ज्या भागात संबंधित नेते कार्यकर्ते जेव्हा आपली बोलण्याची पातळी मर्यादा सोडून एकमेकांच्या व्यक्तीगत आयुष्यावर चारित्र्यावर त्याच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीवर बेताल बोलून येथील वातावरण बिघडवणारी वक्तव्ये करतात त्यावेळी त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई पोलिस प्रशासन का करत नाहीत हा प्रश्न आहे एरवी हेच पोलिस प्रशासन सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आपल्या कडक शिस्तीचा बडगा दाखवून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली सामाजिक ऐक्याला तडे जाण्याची शक्यता या व अशा अनेक कारणांसाठी सामान्य नागरिकांना कायद्याची भाषा दाखवतात मात्र गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांचे जबाबदार प्रवक्ते तसेच पक्ष पदाधिकारी पक्षाचे अध्यक्ष आपल्या विरोधी पक्षाचे नेते कार्यकर्ते यांचेवर अत्यंत खालच्या पातळीवर व बेताल वक्तव्य करून शांतता भंग करत आहेत या वातावरणात संबंधित पक्षाचे कार्यकर्ते नेते एकमेकांशी भिडले आहेत मुद्द्यावरुन गुद्दे देत आहेत त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं युपी बिहार मध्ये तेथील राजकीय हाणामारी राजकीय वैमनस्य यावरून जोरदार भांडण मारामाऱ्या तेथील आमदार मंत्री खासदार यांच्या मध्ये झाल्याचे ऐकिवात होते पण महाराष्ट्रात असे कधी घडेल वाटले नव्हते माध्यमातून दररोज राजकीय शिमगा नेत्यांच्या नावानं हैदोस व गुंडागर्दी कशी चालू आहे हे पाहून उबग आला आहे सत्तेच्या साठमारीत खुर्ची साठी एकमेकांचे वस्त्रहरण होत आहे या मध्ये कोणाला नांव ठेवायची व कोण साजुक आहे हे जनता जनार्दन यांच्या लक्षात आले आहे पण कायदा सुव्यवस्था राखण्याची नैतिक जबाबदारी असलेले पोलिस प्रशासन यांनी वेळीच हस्तक्षेप करून हाताबाहेर जाऊ पहाणारे वातावरण व शांतता बिघडली जाणार नाही याची योग्य काळजी व खबरदारी घेतली तर बेजबाबदार व बेछूट सुटलेल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कायद्याचा लगाम बसेल.