solapur

मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार राम सातपुते यांचा निषेध

 

संचारवृत्त(प्रतिनिधी) अकलूज

  • दि.१४जुलै रोजी घडलेल्या घटनेत विशालगड गजापूर येथील अतिक्रमण हटविताना मुस्लिम समाजाची घरे आणि मस्जिद यांची तोडफोड करण्यात आली सदर बाब कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे या गोष्टीच्या निषेधार्थ माळशिरस तालुका समस्त मुस्लिम समाजाचे वतीने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
  • सदर निवेदनात विशाळगडावरील घटनेचा आणि माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार राम सातपुते यांनी विशाळगड घटनेबाबत समाज माध्यमावर मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करत समाजात तेढ निर्माण करणाऱ्या जातीयवादी मानसिकतेच्या वृतीचा निषेध केला आणि लोकशाही संविधानिक पदावर असलेल्या बेजबाबदार लोकप्रतिनिधींवर कारवाई व्हावी असेही समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
  • सदर निवेदन महसुल नायब तहसीलदार सिद्धनाथ जावीर यांचेकडे सुपुर्द केले यावेळी बाळासाहेब धांईंजे, विकास धांईंजे, बशीर काझी, साजिद सय्यद, लालखान पठाण, जुल्कर शेख, जुबेद दुरुगकर, सलीम मुलाणी, अब्बास शेख, सुरज सय्यद, मुबारक नदाफ, इसाक पठाण, हैदरअली मुलाणी, इरफान शेख, अमजद कोरबू यांच्या सह बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.
  • *विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली मुस्लिम समाजावर अन्याय करणारे आणि त्या भुमिकेला सोशल मिडियावर गरळ ओकणाऱ्या जातीयवादी विकृती असणाऱ्या आमदार राम सातपुतेंना माळशिरस तालुक्यातील सुज्ञ जनता कधीही थारा देणार नाही आणि जातीय वादावर आपली राजकीयपोळी भाजणाऱ्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता नक्की जागा दाखवेल.

जुल्कर शेख,
अध्यक्ष, लोकनेते प्रतिष्ठान अकलूज.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button