दूछ उत्पादकांना दिलासा.
अकलूज (प्रतिनिधी)
उन्हाळ्यात गायीच्या दुधाच्या दरात मोठी घसरण झाली होती. ज्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना उत्पादन खर्च मिळणे देखील कठीण झाले होते. मात्र इंदापूर येथील दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाने गायीच्या दुधाला प्रतिलिटरलिटर मागे ५ रुपयांनी वाढ करण्यात आली असून बळीराजाला रविवार (दि. २१) पासून प्रतिलिटर ३० रुपये प्रमाणे दर देण्यास सुरुवात केल्याने दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.या निर्णयामुळे शेतकर्यांना मात्र फायदा होणार आहे. दरवाढीची अंमलबजावणी दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाच्या वतीने रविवारपासून करण्यात आली आहे. इंदापूर दूधगंगा दूध उत्पादक संघाचे संचालक राजवर्धन पाटील म्हणाले की, दूधगंगा दूध उत्पादक संघाच्या वतीने रविवारपासून नवीन दरवाढलागू झाली आहे, यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी हा शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय करत असल्याने दूध दरवाढीचा विषय हा प्रपंचाशी निगडित होता. रविवापासून नवीन दूध दरवाढ लागू झाल्याने याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.