ऐसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार का दिला जात नाही
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार का दिला जात नाही
श्रीपूर (बी टी शिवशरण)आपल्या साहित्यातून दलित उपेक्षित वंचित दुर्लक्षित समाज घटकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे श्रमिक कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपली झुंजार लेखणी चालवणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एक तारखेला जयंती आहे देशभरात त्यांना सर्वस्तरातून अभिवादन प्रणाम सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान सभा मिरवणुका पोवाडे इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतील ते कार्यक्रम होतच राहतील पण या थोर मानवतावादी विचारवंत साहित्यिक व महान कलावंत असलेल्या अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी अण्णा भाऊ प्रेमी तसेच अनेक सामाजिक सांस्कृतिक संघटना रिपब्लिकन पक्ष इत्यादींनी केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली आहे पाठपुरावा होत आहे मात्र हेतुपुरस्सर त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी का विलंब केला जात आहे हे समजायला मार्ग नाही एकीकडे मानधन घेऊन क्रिकेट कब्बडी खेळणारे तसेच चित्रपट नाटक यात काम करत मानधन घेणाऱ्यांना भारतरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार खिरापती प्रमाणे वाटले जातात पण केवळ शाळेची दिड दिवस पायरी चढलेल्या पण आपल्या साहित्य प्रतिभा व अंगभूत बुध्दी वैभवाने साहित्यक्षेत्रात अनमोल साहित्य कृती निर्मिती करुन कथा कादंबऱ्या लोकनाटये तमाशा पोवाडे स्फुट लेखन करुन साहित्य महामेरू ठरलेल्या अण्णा भाऊ यांना त्यांच्या प्रतिभेची दखल घेतली जाऊ नये ही फार मोठी शोकांतिका आहे देशातील तमाम श्रमिक कष्टकरी कामगार शेतकरी मजूर हमाल व लोककलावंत यांना खंत लागून राहिली आहे ते दलित समाजात जन्माला आले म्हणून त्यांची चुक समजायची का अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य कलावंत व पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीतील लिखाणाची रशिया सरकारने त्या वेळी नोंद घेऊन त्यांना रशिया मध्ये निमंत्रित करून त्यांचा बहुमान केला पण अण्णाभाऊ यांच्या निधना नंतर साठ वर्षानंतर ही त्यांची दखल घेण्याची उपरती महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांना येऊ नये हे दुर्दैव आहे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दिला तरच त्यांची महती योग्यता व त्यांची किर्ती दिगंत होईल अशातला भाग नाही परंतु ज्यांची लायकी व पात्रता नसणारांना भारतरत्न दिला जातो मग ज्यांनी त्या वेळी निक्षून सांगितले होते ही पृथ्वी शेषा च्या मस्तकावर तरली नसून ती पृथ्वी श्रमिक कष्टकरी दलितांच्या तळहातावर तरली आहे क्रांतीचा नारा देऊन सामाजिक लढ्याचे रणशिंग फुंकणारे व आपल्या प्रतिभेच्या जोरावर अनेक साहित्यिक कृती जन्माला घालून माणसातील दुःख दारिद्र्य कष्ट या वेदनेला वाट मोकळी करून देणारे अण्णाभाऊना भारतरत्न पुरस्कार देण्यात काय अडचणी आहेत जर अण्णाभाऊ साठे दुसर्या देशात जन्माला आले असते तर त्यांचे साहित्य त्यांची प्रतिमा तेथील त्यांच्या घराघरात शाळा महाविद्यालये विद्यापीठ यात पुजलेली पहायला मिळाली असती कारण त्यांची बुध्दि ज्ञान साहित्य त्यांच्यातील थोर कलावंत याची दखल घेऊन त्यांचा बहुमान केला असता इथं मात्र त्यांची जात आडवी येते.