डी.एस.गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
डी.एस.गायकवाड(पत्रकार) यांना वाढदिवसाच्या हार्दिक ह शुभेच्छा शुभेच्छुक–+ प्रा नरेंद्र भोसले.
पत्रकारिता तसा खूप जिकिरीचा विषय आहे. यासाठी प्रखर बुद्धिमत्ता लागते. नेटकी व नेमकी भूमिका मांडावी लागते. विचारात सौंदर्य असावे लागते. कर्तव्य सन्मुख आणि अंतर्मुख बनविण्याची कला आत्मसात करावी लागते. तेव्हा कुठं वार्तापत्र किंवा वार्ता, बातमी किंवा घटना, सत्य आणि वास्तविकता योग्य वेळी, निटनेटक्या व योग्य शब्दात मांडता येतात.कवी जसा जन्मावा लागतो. तसा पत्रकार आकाराला यावा लागतो. कवी आपल्या कवितेत कल्पनेने रंग भरतो. पण पत्रकाराला तसं बातमीमध्ये कल्पनेचं झालर लावता येत नाही. पत्रकाराला स्वतः बातमीत उतरावं लागतं. पत्रकार हा धक्का धक्कीचे साहित्य निर्माण करणारा वास्तववादी साहित्यिकच असतो. निःपक्ष व निर्भीडपणे सत्य मांडण्यासाठी समाजावर, गोरगरिबांवर, स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी वृत्तपत्राची आवश्यकता असते. याची जाणीव डी.एस.गायकवाड यांना झाली. म्हणतात ना, परिस्थितीनं तंगडे वर केले की, कोवळ्या वयातही शहाणपण सुचतंय. या जोखिम स्विकारलेल्या परिस्थितीमुळं आजुबाजुला घडणाऱ्या ताज्या घडामोडी व बातम्या समाजपटलावर पेरण्यासाठी वृत्तपत्रांची गरज असते. या जाणिवेतून पत्रकार मनाचा जन्म होऊन डी.एस.गायकवाड नावाच्या उमद्या पत्रकाराचा जन्म तांदुळवाडी या गावी झाला.रणधैर्य या साप्ताहिका पासून त्यांनी सुराज्य,जनमत अशा अनेक वृत्तपत्रासाठी लिखाण केले, दोन तीन विद्रोही पुस्तके प्रकाशित केली,आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षांतील कार्यकर्ते यांच्याशी संपर्क आहे.धम्म कार्यांत सुध्दा ते तन मन धनाने सहभागी होतात.पत्रकारितेचा प्रारंभ ६ जानेवारी १८३२ साली झाला. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राने त्याची सुरुवात केली. हे महाराष्ट्रातील पहिलं वृत्तपत्र. यानंतर मुक समाजाच्या वेदना व विद्रोह मांडण्यासाठी दलित पत्रकारितेला सुरुवात झाली. दलित समाजातील पहिले पत्रकार गोपाळ बाबा वलंगकर हे आहेत. त्यांनी १८८८ साली विचार विध्वंस मधून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. नंतर डॉ.बाबासाहेबांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली. हा पत्रकारितेचा वारसा डी.एस.गायकवाड यांच्या पाठीशी आहे. म्हणूनच डी.एस.गायकवाड यांची पत्रकारिता प्रयोजनमूलक, निःपक्ष आणि निर्भिड आहे.तांदुळवाडी या गावी एका राजकीय सभेसाठी मी गेलो होतो.आणि माझं भाषण जोरदार झालं होतं,तेव्हा डी.एस.गायकवाड माझे कौतुक करत होते आणि हे 500 रूपये घ्या जाताना जेवनं करा.रात्र झाली आहे,आमच्या येथील हाँटेल बंद झाली आहेत.हा जिव्हाळा आज फार मोठा आहे.अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम ते नेहमी करत असतात. त्यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे. तसेच विस्तृत श्रवण शक्ती, लेखन ज्ञान, ध्येयवाद, अभ्यासू , सत्यनिष्ठ, निर्भीडता, , जिज्ञासावृत्ती, मनमिळाऊ स्वभाव, चारित्र्य संपन्न व प्रेरणादायी असे गुणवैशिष्ट्ये त्यांच्या अंगी दिसून येतात. माळशिरस तालुक्यातील ज्या काही घटना घडामोडी घडतात त्या दिवस भराच्या घडामोडी संकलन करुन एवढ्या वरच गप्प न बसता, पोलिस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालय, कृषी कार्यालय यासह इतर प्रशासकीय कार्यालयात, जनतेच्या आलेल्या तक्रारी संदर्भात, अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून बोलून तक्रारीचे, अडचणीचे निवारण करतात. सत्य शोधण्यासाठी बातमीचा पाठलाग करणारा पत्रकार म्हणून डी.एस.गायकवाड यांची ख्याती आहे. अन्यायाविरुद्ध झुंज देणारा झुंजार पत्रकार असे त्यांना संबोधले . समाज माझाही आहे. समाज तुझाही आहे. फरक एवढाच की, तू बहिष्कृत आणि मी माझ्या समाजात आहे. ही समाज उन्नतीची भूमिका घेऊन समाजावर, गोरगरिबांवर, स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या डी.एस.गायकवाड आज वाढदिवास त्या निमित्ताने. डी.एस. तुम्ही जगावं हजारो वर्षे हीच माझी इच्छा, म्हणून तुम्हाला देतोय लाख लाख सदिच्छा.
प्रा. नरेंद्र भोसले.बोरगांव.मो.9158681826