सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राची पंधरा वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळणीच्या वातावरणात संपन्न
सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
महिला आर्थिक विकास महामंडळ (सोलापूर) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिरस स्थापित सावित्रीबाई लोकसंचलित साधन केंद्रा यशवंतनगर या संस्थेची १५ वार्षिक सर्वसाधारण पार खेळीमेळीच्या वातावरणात अकलूजच्या स्वयंवर मंगल कार्यालय पार पडली.
या सभेसाठी मुख्य अंचल प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र झोनल ऑफिस सोलापूरचे संजीवकुमार,माजी सभापती व शिवरत्न वेलफेअर ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.वैष्णवीदेवी मोहिते पाटील,जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे माविम सोलापुर सतीश भारती सहा. जिल्हा समन्वय अधिकारी मावीम सोलापूर,तालुका कार्यक्रम व्यवस्थापक माळशिरस रणजीत शेंडे,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.सुनंदा फुले,जिल्हा व्यवस्थापक वैभव घाडगे बॅक ऑफ महाराष्ट्रा सोलापूर, शाखाधिकारी गव्हाणे अकलुज,बँक ऑफ इंडिया माळशिरसचे शाखाधिकारी गुप्ता साहेब,आदित्य सर,व गणेश सर ICICI बँक,नगर परिषद करमाळाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी तुषार टांकसाळे तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव,तसेच सीएमआरसी अध्यक्षा जयश्री एकतपुरे करमाळा शहरस्तर संघ अध्यक्षा वंदना कांबळे सावित्रीबाई लोकसंचालित साधन केंद्रच्या सर्व कार्यकारणी,बचत गटातील सर्व महिला उपस्थित होत्या.
या सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून,दिप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर प्रार्थना झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्यवस्थापक तनुजा पाटील यांनी केले त्यानंतर अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला.यावेळी सन २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या आणि पारधी समाजातील महिला बचत गटांनी चार वेळेस कर्ज घेऊन व्यवस्थित परतफेड केलेल्या बचत गट यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.संजीवकुमार,सोमनाथ लांमगुंडे,सौ वैष्णवीदेवी मोहिते पाटील,सतीश भारती,रणजित शेंडे यांनी केले यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने लोकायत व सावित्रीबाई सीएमआरसी यांना प्रतिनिधीत्व तत्वावर माळशिरस तालुका म्हणून ३ कोटी ३७ लाख कर्ज वाटप करण्यात आले आणि सोलापूर जिल्हा 5 कोटी कर्जवाटप बँक महाराष्ट्र यांच्या कर्जवाटप मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आले,यावेळी सोमनाथ लांमगुंडे बँकेच्या विविध कर्ज योजना,वैयक्तिक कर्जाच्या योजना,गटाचे व्याजदर कमी करणे.याविषयी सविस्तर माहिती उपस्थित महिलांना दिली तसेच समाज कल्याण महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती महिलांना दिली त्याचप्रमाणे वैष्णवी देवी मोहिते पाटील यांनी महिलांसाठी माळशिरस तालुक्यात १०० महिलांची मुकामी ट्रेनिंग सेंटर लवकरच माळशिरसमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले.तसेच महिलांनी जास्तीत जास्त ट्रेनिंग घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असे सांगितले भविष्यात करण्यात येईल हे देखील सांगितले त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे रणजीत शेंडे यांनी एमएसआरएलएम च्या विविध योजना,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम,पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम याविषयी माहिती दिली.सतीश भारती सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी यांनी महिला बचत गटामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे.महिलांच्या त्रिस्तरीय संस्था बांधणी प्रभाग संघ ग्राम संघ विषयी माहिती दिली बचत गटांचे व्याज दर समान करणे याविषयी माहिती दिली.
यावेळी बचत गटातील महिलांच्या वतीने विविध कला गुण कार्यक्रम सादर करण्यात आले,यामध्ये लेझीम,टाळमृदुंग डान्स,योगा ड्रान्स असे ग्रुप डान्स सादर केले.त्याच बरोबर वैयक्तीक लावण्या,डान्स पण सादर केले तसेच सर्वांनी सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.अध्यक्षीय भाषण झाले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन तनुजा पाटील व्यवस्थापक यांनी केले.ही सभा घेण्यासाठी सावित्रीबाई फुले लोक संचलित साधन केंद्राच्या सीएमआरसी लेखापाल, उपजीविका सल्लागार क्षेञसमन्वयक,ग्रामसंघ लेखापाल,सीआरपी सर्व कार्यकारणी व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाचे मार्गदर्शन यांच्या सहकार्याने 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सपन्न झाली.
पारधी समाजातील गरजूंना मदत—
पुर्वीच्या काळी पारधी समाज हा गावाच्या बाहेर पालावर जीवन जगत होता.त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता.आता स्त्री पुरुष गावागावात कष्ट करून उदरनिर्वाह करू लागले आहेत. त्यामुळे त्यांची गावात हळूहळू पत वाढू लागली आहे.त्यामुळे लोकांचा या समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन ही हळूहळू बदलू लागला आहे.त्यामुळे माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथील सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने पारधी समाजातील महिलांचा बचत गटाची निर्मिती करण्यात आली असून आजपर्यंत त्यांच्या बचत गटातील महिलांना चार वेळेस कर्ज देण्यात आले होते.ते कर्ज बचत गटातील सर्व महिलांनी वेळेत परत केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते या बचत गटातील महिलांचा ट्राॅफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.