युवा सेनेच्या वतीने गणेशगाव बंधाऱ्यावर जन आक्रोश आंदोलन
युवा सेनेच्या वतीने गणेशगांव बंधाऱ्यावर जन आक्रोश आंदोलन
गणेशगाव(प्रतिनिधी)
युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या वतीने गणेशगांव बंधाऱ्यावर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे निवेदन शाखा अभियंता धैर्यशील इनामदार यांनी स्विकारले.
माळशिरस तालुक्यातील निरा नदीवरील गणेशगांव येथील बांधाऱ्याचे काम निष्कृष्ट दर्ज्याचे झाले असल्यामुळे तो बंधारा वाहून गेला आहे .त्या बंधाऱ्याचे काम गेले सन 2022,2023,2024 या साली अनेक वेळा झाले आहे गेल्या .अधिकाऱ्यांचे खिशे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्चून त्या बंधाऱ्याचे काम केले जाते परंतु ते केलेले काम पहिल्याच पाण्या मध्ये वाहून जाते व सरकारचा पैसा पाण्यात वाहून जातो
⊃त्यामुळे गणेशगांव येथील बंधाऱ्याचे काम आता पर्यंत किती वेळा झाले .तो बंधारा आता पर्यंत किती वेळा वाहून गेला .या बांधाऱ्यास लाखो रुपये खर्च केलेले ते समंधित अधिकाऱ्याकडून व ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावेत .या बंधाऱ्याचे काम तात्काळ करून शेतकऱ्यांना पाणी अडवून दयावे तसेच माळशिरस तालुका व इंदापूर तालुक्याचा दळणवळनाचा तुटलेला संपर्क त्वरित चालू करावा अन्यथा युवा सेना अधिकार्यांना खुर्ची वरती बसू देणार नाही व समंधित कार्यालयाला टाळे ठोकेल असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे.यावेळी महादेव बंडगर दत्ता साळुंके सचिन भोसले श्रीमंत शेंडगे,पोपट रुपनवर, विठ्ठल नलवडे, आबासाहेब बाबर, सिताराम शेंडगे, अप्पासाहेब शेंडगे,अमिर कोरबु, गणेश जाधव,भाईसाहब पाटील, माऊली मदने,बप्पा वाघ, गणेश यादव.नामदेव पराडे सचिन ताटे अप्पा महाडिक अवी पराडे बन्सीराम भोई इ शिवसैनिक आणी युवा सैनिक उपस्थित होते.