महर्षी संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

महर्षि संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात संपन्न
संचार वृत्त अपडेट
छत्रपती शिवाजी महाराजांकडून तत्त्वे ,नीतिमत्ता ,कुशाग्रता ,नेतृत्व संस्कारशील या गुणांची शिदोरी घेऊन प्रत्यक्ष कृतीत त्याचा अवलंब करावा.
प्रा.रोहित देशमुख
शिवव्याख्याते .
महर्षि संकुल यशवंतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली .कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील संस्थापक सयाजीराजे मित्र मंडळ अकलूज ,प्रा.रोहित देशमुख शिवव्याख्याते व इतिहास अभ्यासक,अॅड.नितीनराव खराडे सभापती महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर उपस्थित होते.
शिवजयंतीच्या निमित्ताने प्रमुख अतिथींचे स्वागत महर्षि वाद्यवृंदाने स्वागत गीताच्या माध्यमातून केले.
मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजपुंज चरित्र अधोरेखित केले.
सर्व प्रमुख अतिथींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले .प्रमुख मान्यवरांचा सन्मान समारंभ संकुलाच्या वतीने पार पडला.
जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला .डॉ.सावन पालवे दंतरोग चिकित्सक ,डॉ. तुळशीराम पिसाळ, प्रभावती लंगोटे यांचा सन्मान सयाजी राजे मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
संकुलातील विद्यार्थी रुद्रा घाडगे ,देवगिरी चुंगे ,विश्वतेज लोकरे ,वृंदा बागल यांनी आपल्या तडफदार भाषाशैलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर शब्दांजली वाहिली. सांस्कृतिक कार्यक्रमात संकुलातील विद्यार्थ्यांनी महाराजांच्या पोवाड्याचे अप्रतिम सादरीकरण केले.
जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या रयतेचा राजा -राजा शिवछत्रपती या महानाट्यातील सहभागी कलाकारांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांकडून तत्त्वे ,नीतिमत्ता कुशाग्रता ,नेतृत्व ,संस्कारशील या गुणांची शिदोरी घेऊन प्रत्यक्ष कृतीत याचा अवलंब करावा असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. रोहित देशमुख यांनी आपल्या व्याख्यानातून केले.
सदर कार्यक्रमासाठी शुभम राजमाने, नवनाथ पांढरे, अनिल जाधव, विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख ,मुख्याध्यापिका अनिता पवार, उपमुख्याध्यापक भारत चंदनकर, पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाझिया मुल्ला यांनी केले तर आभार शिवाजी पारसे यांनी मानले.