solapur

माढा विधानसभेचे प्रबळ दावेदार संजय कोकाटे

माढा विधानसभेचे प्रबळ उमेदवार संजय बाबा कोकाटे
जनतेला शपथपत्र पत्रक काढून आपली भूमिका केली स्पष्ट

बी टी शिवशरण ज्येष्ठ पत्रकार

श्रीपूर(प्रतिनिधी)सन दोन हजार चोवीस ची माढा विधानसभा निवडणूक संघर्षमय वळणावर येऊन ठेपली आहे यावेळी कोणत्याही परिस्थितीत माढा विधानसभा निवडणूक लढून आमदार होणारच असा प्रबळ दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे संजय बाबा कोकाटे यांनी केला आहे त्यामुळे माढा विधानसभा निवडणूक अटीतटीची होणार आहे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांना या वेळी त्यांच्या घरातूनच विरोध झाल्याचे समोर आले आहे त्यांचे बंधू रमेश शिंदे यांनी बारामती जाऊन शरदचंद्र पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे त्यामुळे आमदार बबनदादा शिंदे त्यांनी विरोध केल्याने माढा मतदारसंघातून खळबळ माजली आहे त्यातच या वेळी आमदार बबनदादा शिंदे हे स्वतः निवडणूक लढतात की आपले चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना उभे करतात याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे मधल्या अनेक दिवसांपासून रणजितसिंह शिंदे यांचे उत्साही समर्थक कार्यकर्ते मित्र मंडळ यांनी रणजितसिंह शिंदे यांचा भावी आमदार म्हणून प्रचार सुरू केला आहे अनेक कार्यक्रमात फ्लेक्स वर भावी आमदार म्हणून उल्लेख होत आहे लोकसभा निवडणूक प्रचार दरम्यान मोहिते पाटील गटाचे वजनदार नेते जयसिंह ऊर्फ बाळदादा यांनी एका बैठकीत स्पष्ट सांगितले आहे की माढा विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील घरातील आमचा कोणी उमेदवार असणार नाही त्यामुळे निवडणुकीत नेमकं काय चित्र स्पष्ट दिसणारं याकडे मोहिते पाटील कार्यकर्त्यांचे लक्ष आहे असे जरी असले तरी बाळदादा यांचे पुतणे शिवतेजसिंह ऊर्फ शिवबाबा यांनी गेल्या दोन महिन्यांपासून माढा मतदार संघात भेटीगाठी संपर्क दौरे सुरू केले आहेत प्रत्येक कार्यक्रमात नेत्यांच्या घरातील मुलामुलींच्या लग्न समारंभात समक्ष हजर रहात आहेत त्यामुळे एकीकडे संजय बाबा कोकाटे यांनी ही जोरदार आघाडी उघडली आहे त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकी पासून मतदारसंघात संपर्क अभियान भेटी गाठी तसेच सोशल मीडिया वर एकतर्फी निवडणूक प्रचार सुरू केला आहे असे दिसते

संजय बाबा कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून कोणत्याही परिस्थितीत माढा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणारच अशी खात्री बाळगून निवडणूक तयारी सुरू केली आहे मोहिते पाटील यांचे घराण्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत गेल्या आठवड्यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी कोकाटे यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे तसेच कोकाटे हे ही अकलूजला मोहिते पाटील यांना अनेकदा भेटायला येत असतात या सर्व वाटचालीत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीची उमेदवारी बाबत संजय बाबा कोकाटे की शिवतेजसिंह मोहिते पाटील या दोघात कोणाला तिकीट मिळणार याची कमालीची उत्सुकता वाढली आहे बाळ दादांनी मध्यंतरी केलेल्या घोषणेचे काय होणार यांवर बरेच काही अवलंबून रहाणार आहे माळशिरस तालुक्यातील महाळुंग मंडल मधील चौदा गावे माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत बबनदादा शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघाचे चार ते पाच वेळा प्रतिनिधित्व केले आहे महाळुंग मंडल मधील चौदा गावांत त्यांनी कोणत्या विकासाच्या योजना कार्यान्वित केल्या तसेच या भागातील रस्ते पाणी बेरोजागारांचा प्रश्न कितपत सोडवला याचे मुल्यमापन मतदार ठरवतील या चौदा गावातील अनेक ज्येष्ठ नेते कार्यकर्ते यांचा वैयक्तिक संपर्क कार्यकर्त्यांची कामे आमदार बबनदादा शिंदे यांनी केल्याचे बोलले जाते तसेच या भागातील अनेक सामाजिक संघटना धार्मिक कार्यक्रम यात्रा उत्सव यांना त्यांनी सढळ हाताने मदत दिल्याचे सांगितले जाते या चौदा गावातील विकासकामे करताना तसेच निधी उपलब्ध असतानाही प्रस्थापित राजकीय कुरघोड्या यामुळे या भागातील काही ग्रामपंचायत संस्था यांनी प्रस्ताव न दिल्याने तो निधी वापरता आला नसल्याचे येथील शिंदे समर्थक कार्यकर्ते उघड बोलताना ऐकायला मिळते महाविकास आघाडी कडून शिवतेजसिंह मोहिते पाटील की संजय बाबा कोकाटे यांना उमेदवारी मिळते यांवर महाविकास आघाडी अवलंबून असणार आहे तर महायुतीतून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे की त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे याकडे महायुतीचे कार्यकर्ते या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेत आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू या निवडणुकीत नेमकी काय भुमिका घेतात तसेच ते स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून उमेदवारी मिळवतात याची कमालीची उत्सुकता वाढली आहे यंदाची माढा विधानसभा निवडणूक संघर्षमय वळणावर येऊन ठेपली आहे हे नक्की

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button