संगम येथे मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वृक्ष वाटप
संगम येथे सखल मराठा समाज्याच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त शालेय मुलांना वृक्ष वाटप
अकलूज(प्रतिनिधी)सखल मराठा सामाज्याच्या वतीने संगम ता माळशिरस येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगम व जिल्हा परिषद शाळा इंगळे वस्ती संगम येथे मुलांना 200 वृक्ष वाटप करून वाढदिवस व जयंती साजरी केली .गावा मध्ये किंवा शाळे मध्ये वृक्षारोपण न करता .शाळेतील मुलांना वृक्ष वाटप करून ती झाडे स्वतःच्या शेतात लावण्यास प्रोसाहित करून ती झाडे जगवण्यासाठी प्रत्येक महिन्याला त्या झाडांची पाहणी करण्यात येणार आहे व एक वर्षांनी 1ऑगस्ट 2025 रोजी एक वर्षांनी ज्या मुलांचे झाड सर्वात मोठे असेल त्या सर्व मुलानं पैकी नऊ मुलांचे नंबर काढून त्या मुलांना बक्षीसे देऊन प्रोसाहित करण्यात येणार आहे व त्या माध्यमातून आगळा वेगळा झाडे जगवण्याचा कार्यक्रम सखल मराठा समाज्याच्या वतीने करण्यात येत आहे .झाडे जगवण्याची संकल्पना ही समाजिक कार्यकर्ते गणेश इंगळे आयोजली आहे या वृक्ष वाटपास युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे ग्रामसेवक जाधव साहेब मुख्याध्यापक विजय भोसले सोनाली कांबळे क्रांतिकारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गणेश भोसले बंडू ताटे देशमुख ग्रामपंचायत सदस्य जयश्री इंगळे रमेश काकडे बाबासाहेब माने दीपक लावंड बाळासाहेब भोसले अमर गोसावी शंकर इंगळे कालिदास इंगळे प्रशांत पराडे ओम पराडे विकास भोई अविनाश भोई मोहन गोसावी अर्जुन दळवी प्राथमिक शिक्षक विजय हेगडे संगीता देशमुख अश्विनी गायकवाड दत्तात्रय धोकटे दत्तात्रय कदम दळवी सर ई. उपस्थित होते