
एन.एम.एम.एस. परीक्षेत ओमेश्वरी मानसिंह चव्हाण माळशिरस तालुक्यात प्रथम.
संचार वृत्त अपडेट
माळशिरस : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारा घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस. परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली .यात तोंडले ता. माळशिरस येथील श्री हनुमान विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळविले आहे. कु.ओमेश्वरी मानसिंह चव्हाण या विद्यार्थिनीने 131 गुण मिळवून माळशिरस तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या विद्यार्थिनीस शासनातर्फे पुढील चार वर्षे प्रतिवर्षी 12 हजार रुपये अशी एकूण 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच विद्यालयातील संचिता शिवाजी चव्हाण ही विद्यार्थिनी सारथी शिष्यवृत्ती योजनेस पात्र झाली असून तिला देखील या योजनेद्वारे शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. प्रशालेमार्फत या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी ओमेश्वरीचे पालक मानसिंह तात्या चव्हाण यांचा देखील प्रशालेमार्फत सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक नायकोडे सर,ज्येष्ठ शिक्षक कोळसे सर, दानोळे सर, पारसे सर, देशमुख सर, कुंभार सर, कोरे सर,.साळुंखे मॅडम इत्यादी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.