शिवसेना (उद्धव ठाकरे) गट महिला आघाडी च्या बैठकीत महिला सदस्य नोंदणीचा शुभारंभ,भगवा सप्ताह आरंभ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना महिला आघाडी अंबाजोगाई शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना महिला आघाडी अंबाजोगाई येथे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी, यांची बैठक संपन्न झाली व या बैठकीत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व संपर्कनेते सुनिलजी प्रभु, संपर्कप्रमुख परशुरामजी जाधव , व संपदा ताई गडकरी लोकसभा प्रमुख सुनील धांडे सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंभोरे शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड संगीता चव्हाण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या यांच्य नेतृत्वाखाली अंबाजोगाई शहरात भगव्या सप्ताहाचे शूभ आंरभ करुन शिवसेना महिला सदस्य नोंदणी कार्यास मोठया उत्साहात प्रारंभ झाला विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक महिला तयार करून
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद दाखवण्यासाठी पुन्हा एकदा उद्धव साहेबांच्या रूपाने विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना च्या महीला पदाधिकारी यांनी व शिवसैनिकनी अहोरात्र मेहनत घ्यावी असे महिला जिल्हाप्रमुख अँड संगीता चव्हाण यांनी सांगितले प्रसंगी शिवसेना महिला उप जिल्हा संघटिका जयश्री पिंपरे शेख फरजाना राधा ढाकणे मनोरमा डोईफोडे सुनिता जोशी समन्वय रेखा गोबाळे तालुका संघटिका नयना शिरसाट विधानसभा संघटना आशा लोखंडे, सुनिता जाधव,शहर संघटिका आशा जोगदंड, मुमताज खतीब,ई.महीला पदाधिकारी उपस्थित होते.