माळशिरस तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार
दुष्काळ निधी तात्काळ जमा न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी गणेश इंगळे करणार माळशिरस तहसील कार्यालया समोर अमरण उपोषण
संचार वृत्त
इंग्रजांच्या तावडीतून भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र झाला परंतु महाराष्ट्र अजूनही पुढाऱ्यांच्या तावडीतून स्वातंत्र झाला नाही . महाराष्ट्र शासनाने योजनांचा नुसता पाऊस चालू केला आहे त्यातली त्यात लाडकी बहीण ह्या योजनेच्या नादात महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचा दुष्काळ निधीच गायब केला आहे अजून 30 ते 40 % शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळाला नाही .उन्हाळा संपून पावसाळा चालू झाला पावसाळाही संपत चालला तरीही शेतकरी दुष्काळ निधीच्या प्रतीक्षेत आहेत . त्यामुळे युवा शेतकरी गणेश इंगळे रा संगम यांचाही दुष्काळ निधी अजूनही भेटलेला नाही त्यांच्या समवेत अजूनही खूप शेतकरी दुष्काळ निधी वाचून वंचित आहेत .काही शेतकऱ्यांना दुष्काळ निधी PM किसान योजना अति वृष्टीचे आलेले पैसे बँक खाते मध्ये जमा झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांकडे बँकांचे कर्ज आहेत अशा शेतकऱ्यांना बँकेने पैसे दिलेले नाहीत कर्ज खातेत पैसे जमा करून घेतलेले आहेत अशा शेतकऱ्यांना बँकेने तात्काळ पैसे शेतकऱ्यांना द्यावेत अशा मागण्याचे निवेदन युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व शिवसेना विधान सभा तालुका प्रमुख महादेव बंडगर ,माळशिरस शिवसेना शहर प्रमुख अशोक देशमुख यांनी माळशिरस तहसील कार्यालयाला दिले आहे या मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 वाजता माळशिरस तहसील कार्यालया समोर युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे हे अमरण उपोषण करणार आहेत असा ईशारा देण्यात आला आहे हे निवेदन तहसील ऑफिसचे प्रवीण सूळ यांनी स्विकारले यावेळी किरण रेडे पाटील धनंजय अण्णासाहेब कदम, विपीन सूर्यवंशी, ई.उपस्थित होते.