सुधाकरपंत परिचारक यांचे पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित कार्यक्रम
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक मालक यांचे चतुर्थ पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित कार्यक्रम
संचार वृत्त
पवित्र स्मृतींची ज्योत तेवते अखंड आमच्या मनी
सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी
आठवुनी तव दिव्य अस्तित्व वृत्ती भारावली
कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष मा आमदार संस्थापक चेअरमन पांडुरंग परिवाराचे श्रध्दास्थान कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांचे चतुर्थ पुण्यस्मरण निमित्ताने शनिवार दिनांक 17.8.2024रोजी वाखरी येथील स्मृतीस्थळावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सकाळी रक्तदान शिबीर सकाळ साडे नऊ ते बारा भव्य रक्तदान शिबीर सकाळी दहा ते अकरा आदरांजली पर मनोगत सकाळी अकरा ते बारा ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांचे किर्तन
बारा ते साडेबारा पुष्पांजली साडे बारा ते दोन महाप्रसाद होणार आहे पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील स्मृतीस्थळावर या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन प्रशांतराव परिचारक व्हा चेअरमन कैलास खुळे कार्यकारी संचालक डॉ यशवंतराव कुलकर्णी यांनी केले आहे