solapur
श्रीमती कमलादेवी आप्पासाहेब माने यांचे दुःखद निधन
श्रीमती कमलादेवी आप्पासाहेब माने यांचे दुःखद निधन.
संचार वृत्त
संग्रामनगर (प्रतिनिधी)
मांगुर (ता.चिकोडी) येथील श्रीमती कमलादेवी आप्पासाहेब माने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.मृत्यू समयी त्या १०८ वर्षांच्या होत्या.त्यांच्या पश्चात ४ मुली,३ मुले,१६ नातवंडे,२१ परतवंडे असा परिवार आहे.महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या त्या सासूबाई होत्या तर आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या आजी होत्या.कडक शिस्तीच्या,सतत कार्यमग्न, दैनिक वृत्तपत्र वाचनाची आवड होती. आपल्या मायेच्या धाग्यांनी अनेक माणसं घट्ट जोडून ठेवली होती.यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.