political

माढा विधानसभेला शिवबाबा की रणजितसिंह मोहिते पाटील

माढा विधानसभेला शिवबाबा की रणजितसिंह मोहिते पाटील

मात्र माढा विधानसभा निवडणूक लढण्यास बाळदादांची नापसंती

श्रीपूर(बी.टी.शिवशरण जेष्ठ पत्रकार)

माढा विधानसभा निवडणुकीत अकलूज मधून शिवबाबा की रणजितसिंह मोहिते पाटील निवडणूक लढणार याकडे माळशिरस तालुक्यातील जशी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे तशीच माढा तालुक्यात उत्कंठा वाढली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कडून अनेकांनी उमेदवारी मिळावी म्हणून बारामती व मुंबईत शरद पवार यांच्याकडे भेटीगाठी वाढवल्या आहेत एकंदरीत तुतारी चे आकर्षण महाविकास आघाडी व इतर पक्षात नाराज असलेल्यांना वाटू लागले आहे माढा विधानसभा मतदारसंघ हा आमदार बबनराव शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून शिंदे समर्थकांनी जणुकाही आपलाच ताबा आहे अशा आविर्भावात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गेल्या महिनाभरापासून संवाद भेटी संपर्क सुरू ठेवला आहे तर अकलूजचे माजी सरपंच व युवा तडफदार नेतृत्व शिवबाबा यांनी संपूर्ण मतदारसंघात दररोज गाठीभेटी वाढवल्या आहेत मात्र गेल्या लोकसभा निवडणूक नंतर जयसिंह ऊर्फ बाळदादा यांनी माढा विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील घरातील कोणी उमेदवार नसणार असल्याचे वारंवार सांगितले आहे त्यामुळे या निवडणुकीत माढा विधानसभा अतिशय रंगतदार चुरशीची व अनपेक्षित धक्का देणारी असणार आहे हे नक्की आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून माढा विधानसभा निवडणूक लढणार हे त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्यांकडून खात्रीशीर बोलले जात आहे रणजितसिंह मोहिते पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार असतील शिवबाबा मोहिते पाटील यांना फक्त पुढे केले आहे व संपूर्ण मतदारसंघात वातावरण निर्मिती केली आहे या सर्व पार्श्वभूमीवर बाळदादांची भुमिका महत्वाची व निर्णायक ठरणार आहे महायुतीकडून माढा विधानसभा निवडणुकीत उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्याला उमेदवारी मिळणार म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी व अभिजित पाटील यांनीही या मतदारसंघात संपर्क दौरे वाढवले आहेत आमदार बबनदादा शिंदे हे या वेळी स्वतः निवडणूक रिंगणात नसणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढवणार आहेत या वेळी माढा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी संजय कोकाटे माढा नगरपरिषद नगराध्यक्षा सौ मिनल साठे हे नविन उमेदवार इच्छुक आहेत जशी जशी निवडणूक लवकर येइल तसे आणखी काही उमेदवार रिंगणात असणार आहेत लोकसभेला माढा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व सोलापूर महाविकास आघाडी कांग्रेस चे दोन उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले आहेत त्यामुळे महाविकास आघाडी ची सोलापूर जिल्ह्यात मोठी ताकद वाढली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button