पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी भाजपकडून नक्की कोण?
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी भाजप कडून नक्की कोण उमेदवारच ठरला नसताना जनतेत संभ्रम कशासाठी
संचार वृत्त
श्रीपुर (बी.टी.शिवशरण ज्येष्ठ पत्रकार)
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार या बाबत जशी उत्सुकता आहे तशीच ती कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळणार अशी पांडुरंग परिवाराला आशा आहे तर दुसरीकडे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनाच भाजप उमेदवारी देणार अशी हवा आवताडे समर्थकांनी सुरू केली आहे या गदारोळात प्रशांत परिचारक हे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे पक्षात जाऊन तुतारी घेऊन निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा व हवा पांडुरंग परिवार व परिचारक समर्थक कार्यकर्ते करत आहेत वास्तविक पाहता परिचारक वा आवताडे यांना भाजपकडून अद्याप कोणताही निरोप नाही आश्वासन नाही तरीही आवताडे यांनाच उमेदवारी मिळणार हे कशाचे आधारांवर त्यांचे हितचिंतक वावड्या उडवत आहेत तर दुसरीकडे प्रशांत परिचारक यांना भाजपकडून उमेदवारी नाही मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून तुतारी हातात घ्यायची हे त्यांचे कार्यकर्ते मतदारसंघात का संभ्रम निर्माण करत आहेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाचे सर्व अधिकार देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून देण्यात आले आहेत ही बाब लक्षात घेतली तर मतदारसंघात सामाजिक राजकीय संस्थात्मक ताकद व जनाधार हे गणित पाहिले जाते प्रशांत परिचारक यांची वर नमूद केले प्रमाणे या मतदारसंघात सर्वच बाजूने पारडे जड आहे समाधान आवताडे यांना मंगळवेढा येथील साखर कारखाना टिकवता आला नाही स्वर्गीय आमदार भारत भालके यांचे निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप कडून समाधान आवताडे यांना प्रशांत परिचारक यांचे शिफारशी नुसार उमेदवारी मिळाली व पांडुरंग परिवार यांनी पुर्ण ताकदीने सहकार्य केल्यामुळे समाधान आवताडे निवडून आले याचे श्रेय प्रशांत परिचारक यांना जाते त्यामुळे राजकीय सामाजिक कुरघोड्या मतभेद आरोप प्रत्यारोप टिका टिप्पणी ही राजकारणात होत असते पण मतदारसंघात बहुतांश वातावरण परिचारक यांना असताना त्यांनी हक्काचे घर सोडून दुसर्याच्या वळचणीला जाऊन हात का पसरावा व कशासाठी सोलापूर जिल्हा नव्हे महाराष्ट्र परिचारक यांचे नेतृत्वाखाली असणारे सर्व संस्था उद्योग कारखाने उत्तम चालू आहेत हजारोंना हाताला काम मिळाले आहे अनेक लहान मोठे व्यवसाय धंद्यांना परिचारक यांचे मार्गदर्शनाखाली अर्थसहाय्य मिळाले आहे त्यामुळे स्वयं पुर्णपणे हजारो व्यावसायिक स्वःताच्या पायांवर उभे आहेत त्यामुळे आर्थिक सामाजिक शैक्षणिक रहाणीमान स्तर उंचावला आहे विद्यमान आमदार समाधान आवताडे हे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात कार्यरत आहेत या सर्वांचा लेखाजोखा व उमेदवार निवडून येण्याची क्षमता तपासूनच भाजप उमेदवारी देणार हे नक्की असे असताना आपणास उमेदवारी मिळणार नाही तेव्हा भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून तुतारी हातात का म्हणून घ्यावी हा विचार पांडुरंग परिवार यांनी करावा