political

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांचे गणित चुकणार

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांचे गणित चुकणार

जनतेच्या मनातील उमेदवार होणार आमदार

श्रीपूर (बी.टी.शिवशरण)

विधानसभा निवडणुकीचा माहोल तयार होऊ लागला आहे माळशिरस तालुक्यात या वेळी काहीही करुन स्थानिक बौध्द किंवा मातंग समाजातीलच उमेदवार यांना मतदान करुन त्याच उमेदवाराला आमदार करायचेच ह्या ध्येयाने प्रेरित झालेल्या मागासवर्गीय समाजाने दंड थोपटून या वेळी माळशिरस तालुका विधानसभा निवडणूक मैदान मारायचे या साठी तयारी सुरू केली आहे सदर मतदारसंघ राखीव असताना व स्थानिक उमेदवार यांचा हक्क आहे पण गेल्या तीन निवडणुकीत बाहेरच्या उमेदवारांना माळशिरस तालुक्यातील जनतेवर लादले गेले मोहिते पाटील यांनी या वेळी वेळापूर चे उत्तम जानकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे जानकर व मोहिते पाटील यांचे सामाजिक राजकीय काय संबंध होते हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहीत आहे हे दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक असताना गेल्या लोकसभा निवडणुकीत जानकर मोहिते पाटील यांनी भाजपला विरोध म्हणून आपली राजकीय भुमिका बदलून ते एकत्र आले जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदार करण्यासाठी मदत केली त्याची उतराई म्हणून मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुका विधानसभा निवडणुकीत वेळापूर चे उत्तम जानकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र मोहिते पाटील यांच्या मनातील माळशिरस तालुक्याचे उमेदवार आमदार होण्याचे राजकीय गणितं चुकणार आहे जनतेच्या मनातील उमेदवार आमदार होणार हे नक्की उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांचे बरोबर माळशिरस तालुक्यात जुळवून घेतले असले तरी त्यांच्या समर्थक धनगर बांधवांनी त्यांची साथ सोडली आहे त्यामुळे जानकर विरोधात धनगर बांधव कार्यकर्ते नेते एकवटले आहेत आणि ते भाजपचा कोण संभाव्य उमेदवार असेल त्याला सहकार्य करणार हे निश्चित आहे या वेळी आमदार राम सातपुते यांना जरी भाजपने उमेदवारी दिली तरी त्यांना ही निवडणूक कमालीची जड जाणार आहे आमदार राम सातपुते यांनी गोरगरीब सामान्य लोकांची कामं मनापासून केली आहेत अनेक गरीब गरजू रुग्णांना उपचारासाठी मोफत सेवा उपलब्ध करून त्यांना जिवदान दिलं आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचे विरोधात गैरसमज व त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाला आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यात यावेळी त्यांना ही निवडणूक सोपी राहिली नाही तसेच या वेळी हा मतदारसंघ राखीव असताना आपल्या हक्काच्या जागेवर उपरा उमेदवार उभे करून त्यांना आमदार केलं जातं ही भावना या वेळी मागासवर्गीय कार्यकर्त्यांत नेत्यांत समाजात बंड करुन उठणारा विषय अस्मितेचा स्वाभिमानी बाणा जागृत करणारे स्फुल्लिंग चेतावले गेलं आहे ही एकंदरीत परिस्थिती व पार्श्वभूमी पहाता मोहिते पाटील यांचे मनातील उमेदवाराला आमदार करण्याचे गणित सपशेल चुकणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button