solapur

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांचा श्रीपुर येथे मेळावा

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांचा श्रीपूर येथे मेळावा

संचार वृत्त 

श्रीपूर(बी.टी.शिवशरण)

महाराष्ट्रातील शेती महामंडळाच्या कामगारांचा येत्या आठ सप्टेंबर 2024रोजी श्रीपूर ता माळशिरस येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती शेती महामंडळ कामगार कृती लढा समीतीचे नेते भालचंद्र शिंदे पाटील यांनी दिली आहे या मेळाव्याला माळशिरस तालुक्यातील श्रीपूर ऊस मळ्यातील सर्व सेक्शन कामगार सदाशिव नगर ऊस मळ्यातील सर्व सेक्शन कामगार उपस्थित रहाणार आहेत या मेळाव्यात शेती महामंडळाच्या कामगारांच्या विविध मागण्या बाबत चर्चा माहिती व पुढील निर्णय घेतले जाणार आहेत या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगार कृती समितीचे सरचिटणीस लढाऊ नेते सुभाष कुलकर्णी उपस्थित राहून मेळाव्यास संबोधन करणार आहेत या मेळाव्यात कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे महाराष्ट्र सरकार यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याचे संयोजकांनी कळवले आहे गेल्या पाच वर्षांपासून कामगारांच्या मागण्या संदर्भात राज्य शासन शेती महामंडळ मुख्य कार्यालय यांच्या कडे लेखी पत्रव्यवहार निवेदन दिले परंतु कसलीही दखल घेतली नाही म्हणून अकरा मार्च रोजी शिर्डी येथे राज्यातील शेती महामंडळाच्या कामगारांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा नंतर मुख्यमंत्री महसूल मंत्री यांची समक्ष भेट घेतली कामगारांच्या मागण्या बाबत चर्चा करून निर्णय घेण्याचं आश्वासन दिले सहा महिने कालावधी होऊनही कबूल केल्याप्रमाणे मागण्या बाबत मुख्यमंत्री महसूल मंत्री यांनी बैठक बोलावली नाही चर्चा केली नाही प्रश्न सोडवला नाही या पुर्वी कामगारांच्या मागण्यांचे बाजूने कामगार न्यायालयात व औद्योगिक न्यायालयात निकाल झाले आहेत परंतु या निकाल विरोधात शेती महामंडळ व राज्य सरकार उच्च न्यायालयात अपील करतात व वर्षानुवर्षे कामगारांच्या मागण्या देय रक्कम देण्यास विलंब करतात दिल्या जात नाहीत रोजंदारी कामगारांना समान कामास समान वेतन ग्राचुइटी बोनस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतानाही त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले जाते वर्षानुवर्षे कामगारांच्या देय रक्कमा दिल्या जात नाहीत याउलट सार्वजनिक हिताच्या नावाखाली एक वर्षात अंदाजे बाराशे एकर जमीन राज्य सरकारने विनामूल्य दिली आहे कामगारांना रहाण्यासाठी दोन गुंठे जागा व पक्की घरं बांधण्यासाठी सरकार मंजुरी देत नाही चौथा पाचवा सहाव्या वेतन आयोगाच्या रक्कमा देतं नाही या सर्व पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी माळशिरस तालुक्यातील शेती महामंडळाच्या ऊस मळ्यातील सर्व कामगारांचा व रत्न पुरी ऊस मळा शिवपुरी मळा फलटण साखरवाडी कोल्हापूर जिल्हा ऊस मळा या सर्व ऊस मळ्यातील कामगारांचा भव्य मेळावा माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त मंदिर नेवरे रोडवर दुपारी बारा वाजता आयोजित केला आहे या मेळाव्याला सर्व कामगार बंधु भगिनी यांनी मोठ्या बहुसंख्येने वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन भालचंद्र शिंदे पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button