solapur

अकलूज येथे जिपीकाँन 2024 संपन्न

अकलूज येथे जिपीकॉन 2024 संपन्न.

संचार वृत्त 

संग्रामनगर(केदार लोहकरे यांजकडून)

माळशिरस तालुक्यातील निमा संघटना,होमिओपॅथी संघटना व रिदम हॉस्पिटल अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने जिपीकॉन 2024 चे आयोजन कृष्णप्रिया हॉल अकलूज येथे करण्यात आले होते.अकलूजला मेडिकल हब असे नावलौकिक आहे.पूर्वी हृदय विकाराच्या उपचारासाठी पेशंटला पुणे,सोलापूर,मुंबई अशा ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागायचे परंतु आता परिस्थिती वेगळीआहे,अकलूजमध्ये हृदयरोग तज्ञ यांनी एकत्र येऊन रिदम हॉस्पिटल हे सुपरस्पेशालिटी हायटेक युनिट चालू केले असल्यामुळे तिथे अत्यावश्यक सेवा अगदी वेळेवर मिळू लागल्याआहेत.रिदम हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ञ डॉ.रोहन हेगडे यांनी चेस्ट पेन ईवैल्यूएशन अँड मैनेजमेंट या विषयावरती मार्गदर्शन केले.डॉ.सौ.शुभांगी माने देशमुख यांनी डॉ.रोहन हेगडे यांचे परिचय करून दिला.डॉ. सौरभ गांधी यांनी एच टी एन/ आय एच डी न्यू एडवांसेस इन कार्डिओलिजी या विषयावरती मार्गदर्शन केले.डॉ.उदय माने देशमुख यांनी सौरभ गांधी यांचा परिचय करून दिले.डॉ.भूषण शिंदे यांनी वैस्कुलर सर्जरी यावरती मार्गदर्शन केले तसेच डॉ.संभाजी राउत यांनी रिदम हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या हृदया वरती अत्याधुनिक उपचाराबद्दल थोडक्यात माहिती दिली.डॉ.श्वेता देशमाने यांनी संभाजी राऊत यांचे परिचय करून दिला‌ सर्वांनी जनरल प्रॅक्टिशनर याच्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये उपयोगी असे मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच डॉ अनिरुद्ध पिंपळे हे कोल्हापूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी झाल्याबद्दल व डॉ. प्रियंका शिंदे महाडिक या माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकारी झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला.अकलूज परिसरातील ज्या डॉक्टरांची मुले नीट,पीजीमध्ये घवघवीत यश मिळवले अशा सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला.यामध्येडॉ.नामदेवराव गायकवाड यांचा चिरंजीव डॉ.विष्णू यांचा ऑल इंडिया रैंक ६३०८ व ९७.१० पर्सेंटाइल मार्क्स मिळाले,डॉ.जावेद मुल्ला यांची कन्या डॉ. तझीनचा ऑल इंडिया रँक ६४०४ व ९७.०८ पर्सेंटाइल मार्क्स मिळाले तसेच डॉ.उमेश नाईक चिरंजीव डॉ.पृथ्वीराज याचा ऑल इंडिया रैंक १०३०६ व ९५.२५ पर्सेंटाईल मार्क्स मिळाल्याबद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुधीर पोफळे व डॉ.आरती पोफळे मॅडम यांनी केले.प्रस्तावना डॉ.शबाना शेख यांनी केली.डॉ. अंकुश टिक यांनी आभारप्रदर्शन केले.या कार्यक्रमासाठी नातेपुते ते नेवरे येथून बहुसंखेने डॉक्टरर्स उपस्थित होते.तसेच महिला डॉक्टर याही बहुसंख्येने उपस्थिती होत्या.कार्यक्रम पार पाडण्यासाठी निमाचे अध्यक्ष डॉ.शिरीष रणनवरे,होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ.अभिजित राजे भोसले,निमा वूमेन्स फोरमच्या अध्यक्षा डॉ.अंजली कदम, होमिओपॅथी वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.वैष्णवी शेटे व टिम निमा आणी होमिओपॅथी टीम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button