गणेशोत्सव निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न
गणेशोत्सव निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न
संचार वृत्त
आगामी काळात दिनांक 07/09/2024 ते दिनांक 17/09/2024 या कालावधीत श्री. गणेश उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार असल्याने त्याअनुषंगाने अकलूज पोलीस ठाणे व अकलूज नगरपरिषद यांचेवतीने सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, गणेशमुर्ती विक्रेते, अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील, पत्रकार बांधव, जेष्ट नागरीक यांची दिनांक नगरपरिषद कार्यालय, अकलूज येथे शांतता कमिटी बैठक घेण्यात आली .सदर बैठकीमध्ये नगरपरिषद सी.ई.ओ. दयानंद गोरे, अकलूजचे माजी ग्रामपंचायत सरपंच किशोरसिंह माने पाटील, अकलूज नगरपरिषद व अकलूज पोलीस ठाणे यांचेतर्फे आयोजित सर्वोत्कृष्ट गणेशोस्तव मंडळ निवड समितीचे परीक्षक जेष्ट पत्रकार भाग्यवंत नायकुडे व अकलूज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या उपस्थितीत आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने सर्व गणेश मंडळांना ऑनलाईन परवानगी घेणेबाबत, डॉल्बी, डी.जे. न वाजवता पारंपारीक वाद्य वाजवुन प्रदुषण मुक्त व पर्यावरण पुरक वातावरणामध्ये गणेश उत्सव साजरा करणेबाबत, सामजिक तेढ निर्माण करणारे देखावा सादर न करणेबाबत, गणेश मुर्तीचे पावित्र्य राखण्याचे अनुषंगाने आवश्यक ती उपाययोजना करुन गणेश उत्सव मंडळामध्ये आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसविणेबाबत, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा रितीने मुर्ती स्थापना करणेबाबत तसेच जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट गणपती, उत्कृष्ट समाजउपयोगी देखावा याबाबत शासन स्तरावर असलेले बक्षीस योजनेबाबत व अकलूज नगरपरिषद व अकलूज पोलीस ठाणे यांचेतर्फे आयोजित सर्वोत्कृष्ट गणेशोस्तव मंडळ निवड याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.
तसेच अकलूज नगरपरिषद व अकलूज पोलीस ठाणे यांचेतर्फे गतवर्षी आयोजित अकलूज येथील सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ 2023 याचे पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. सदरची शांतता कमिटी बैठक मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी सो।, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर सो।, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो। यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली असुन आगामी गणेश उत्सवाचे अनुषंगाने आवश्यक सुचना देऊन योग्य ते मार्गदर्शन केलेले आहे.