solapur

125 गोरगरीब महिलांना पुणे ते चेन्नई मोफत विमान प्रवास

भाजपा चे अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या वतीने १२५ महिला तिरुपती बालाजी दर्शनासाठी रवाना

१२५ गोरगरीब महिलांना पुणे ते चेन्नई मोफत विमान प्रवास.

अकलूज (प्रतिनिधी)
सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टी अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या अथक प्रयत्नातून गोरगरीब व गरजू महिलांना कुटुंबास आधार म्हणून २०० शिलाई मशीनचे वाटप तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी २०० सायकल वाटप तसेच गरजू महिलांना अकरा पिठाच्या गिरणीचे वाटप तसेच गोरगरीब महिलांना व गरजूंना प्रत्येक कुटुंबास पाच पात्र्याची पाने अशा ५० कुटुंबास पत्र्याची पाने वाटप तसेच कोरोना काळात माणूस माणसाच्या जवळ येत नव्हता त्यावेळेस मदतीला धावून येणारा माणसातला देव म्हणजे महादेव कावळे यांनी ३०० कुटुंबास दोन महिने जेवणाचे डबे घरपोच दिले तसेच गाणगापूर येथील देवदर्शनासाठी १६५ महिला यांना देवदर्शन घडवून आणले तसेच मागील वर्षी १२५ महिलांना बालाजी येथील देवदर्शन घडवून आणले तसेच यावर्षी मागील दोन वर्षाप्रमाणे गोरगरिबांचे स्वप्नात सत्यात उतरवण्यासाठी जे लोक कधीही विमान प्रवास करणार नाहीत किंवा करू शकणार नाहीत अशा गोरगरीब १२५ महिलांना विमान प्रवासाने बालाजीचे दर्शन घडवून आणण्यासाठी आज रोजी अकलूजमधून या देव माणसांनी हे महान काम केले आहे या महान कार्यास गोरगरिब जनतेतून मनापासून दुवा व आशीर्वाद निघत आहेत.महादेव कावळे आपणा कार्यास व आपण केलेल्या सत्कर्मास सर्व जनतेचा आशीर्वाद असाच सदैव पाठीशी राहील अशा भावना एक चर्चा यात्रेचा लाभार्थी म्हणून मी व्यक्त करत आहे आपलीच हितचिंतक व आपली एक बहीण एका महिलेने आपले विचार प्रकट केले.जीवनात कधी ही विमानाला जवळून पाहू न शकलेल्या गरीब महिला विमान प्रवास करणार असल्यामुळे त्यामहिलांच्या चहे-यावर आज वेगळाच आनंद दिसत होता.
भारतीय जनता पार्टी अकलूज शहराध्यक्ष महादेव कावळे यांच्या अध्यक्षतेखाली १२५ महिलांना मोफत विमान प्रवासाचे बालाजीचे देवदर्शन करण्यासाठी अकलूज येथील अकलाई मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून या प्रवासाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के.के.पाटील माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख जिल्हा परिषद सदस्य दहेगाव गट ऋतुजा ताई मोरे भारतीय जनता पार्टीचे नेते बाळासाहेब वावरे तसेच किसान सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर अकलूज ग्रामपंचायतच्या माजी सदस्य ज्योतीताई कुंभार आणि बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button