solapur
माळशिरस पंचायत समितीमध्ये राजकुमार राऊत व निशिकांत लोखंडे यांचा सेवापूर्ती समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न
माळशिरस पंचायत समितीमध्ये राजकुमार राऊत व निशीकांत लोखंडे यांचा सेवापुर्ती समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न.
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून) माळशिरस पंचायत समितीमधील महिला व बालकल्याण विभागात काम करणारे वरिष्ठ सहाय्यक राजकुमार दादासाहेब राऊत व बांधकाम विभागातील निशीकांत लोखंडे यांचा सेवापुर्ती समारंभ पंचायत समितीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात व दिमाखात समारंभ पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी मनोज राऊत व वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका शिंदे उपस्थित होते.
- या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून दिप प्रज्वलनाने करण्यात आली.राजकुमार राऊत यांनीपंचायत समिती येथे महिला व बालकल्याण विभागात गेली तेरा वर्षे उत्कृष्ट कार्य केले आहे तर निशीकांत लोखंडे यांनी बांधकाम विभाग चांगले केल्याबद्दल गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी या दोघांचा फेटा शाल हार श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना मनोज राऊत म्हणाले की,राजकुमार राऊत हे अकलूज ग्रामपंचायतीमधून पंचायत समितीमध्ये आल्यामुळे त्यांच्या ग्रामपंचायतीच्या कामाच्या अनुभववाचा फायदा आमच्या कार्यालयाला खूप झाला आहे. - माणूस नोकरी लागला की संसार, मुलेबाळे गुरूपुटून जातो पण राऊत यांनी महिला व बालकल्याण विभागात आपला परिवार समजून काम केले आहे.त्याची पोच पावती म्हणजे आजचा भव्यदिव्य सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजन.हे काम करत असताना सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून माळशिरस पंचायत समितीची नाव उज्वल केले आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना राजकुमार राऊत यांनी सांगितले की,माझ्या नोकरीची सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभाग,अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय, ग्रामपंचायत अकलूज येथे २३ वर्षे सेवा व नंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समिती माळशिरस बाल विकास प्रकल्प माळशिरस व अकलूज येथे तेरा वर्षे सेवा करून वयोमानुसार ५८ वर्षे पूर्ण झाल्याने ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.अकलूज ग्रामपंचायतीचे तात्कालीन सरपंच जयसिंह मोहिते-पाटील यांच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतमध्ये नोकरीस सुरवात केली.पुढे २३ वर्ष ग्रामपंचायतीची माध्यमातून सेवा केली.महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी ग्रामपंचायत मधील कर्मचारी यांना जिल्हा परिषद सेवेमध्ये दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे मला जिल्हा परिषदेमध्ये नोकरी करण्याची संधी प्राप्त झाली.माझ्या या सेवेमध्ये मोहिते-पाटील, माने-पाटील,माने-देशमुख यांचे मोलाचे सहकार्य व भरभरून आशिर्वाद लाभले. - या कार्यक्रमाला भारत कदम,कक्ष अधिकारी महेन्द्र बुगड,शिक्षण विस्तार अधिकारी स्वरा महामुनी,बाल विकास प्रकल्प विस्ताराधिकारी स्वप्निल वाघमारे,संग्रामसिंह मोहिते- पाटील मित्र मंडळ, प्रताप क्रिडा मंडळाचे कार्यकर्ते,माळशिरस तालुका नाभिक समाजाचे कार्यकर्ते,अंगणवाडीच्या सुपरवायझर,सेविका,मदतनीस, आप्तेष्ट व मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय राऊत यांनी केले सूत्रसंचालन शकील शेख तर आभार प्रदर्शन इलाई बागवान यांनी मानले.