solapur

नगरपंचायत चे सर्व विकासात्मक कामे येत्या सहा महिन्यात मार्गी लावण्याचा प्रयत्न करू

नगरपंचायतची सर्व विकासात्मक कामे येत्या सहा महिन्यांत मार्गी लावण्याचा प्रयत्न करू;मुख्याधिकारी सतीश चव्हाण

 

श्रीपूर (बी टी शिवशरण ज्येष्ठ पत्रकार)

महाळुंग श्रीपूर नगरपंचायतची विकासात्मक कामे येत्या सहा महिन्यांत मार्गी लावण्याचा प्रयत्न करू अशी माहिती नूतन मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सतिश चव्हाण यांनी माहिती दिली या वेळी उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील ज्येष्ठ नेते नगरसेवक नानासाहेब मुंडफणे या वेळी उपस्थित होते वार्डातील सर्व समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना मुख्याधिकारी यांनी सर्व वार्डात समक्ष फिरुन पहाणी करावी असे सुचवले असता ते भेट देतो म्हणाले सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे सर्व भागात डास वाढले आहेत डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे त्या संदर्भात त्यांना दक्षता घेण्याची सुचना केली असता आरोग्य विभागाला पत्र देऊन घरोघरी जाऊन सर्व्हे करुन तपासणी केली जाईल असे सांगितले आहे विकास कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होईल तसे रस्ते गटारी व सार्वजनिक विकास कामे केली जातील तसेच नगरपंचायत विकास आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे तो मंजूर झाल्यानंतर कामं व्यवस्थीत व सुरळीत पार पाडली जातील अशी माहिती दिली पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू आहे तसेच पाणी दुषित येते या बाबत ते म्हणाले पावसाळा सुरू आहे नदीत पाणी पुरवठा करणारी मोटार पाण्यात बुडलेली असते ती काढणे बसवणे अडचणींचे होते आरो प्लांट बाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल कचरा व्यवस्थापन साठी घनकचरा व्यवस्थापन केले जाईल ओला कचरा सुका कचरा वेगळी व्यवस्था करुन त्यानुसार नियोजन होईल नगरपंचयत मध्ये सर्व सामान्य नागरिक प्रशासकीय कामासाठी नगरपंचायत मध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यांना व्यवस्थीत वागणूक मिळत नाही काही कर्मचारी अधिकारी उद्धट बोलतात अपमानास्पद वागणूक देतात या बाबत त्यांचे लक्ष वेधले तेव्हा नगरपंचायतचे सर्व कर्मचारी अधिकारी यांना योग्य समज दिली जाईल असे त्यांनी सांगितले तसेच नगरपंचायतला शासनाकडून नवीन अध्यादेश माहिती उपक्रम योजना यांची आलेली सर्व माहिती नगरपंचायत मध्ये ठळक नोंद असलेला फलक व माहिती लावली जावी दाखले अर्ज माहिती वेळेवर देण्यात यावी यांवर त्यांना सांगितले की नगरपंचायतचे कर्मचारी अधिकारी एखादा दाखला मागण्यांसाठी गेले तर आठ दिवसांनी या म्हणतात या बाबत दाखले उशिरा का दिले जातात याची चौकशी करावी तसेच खराब झालेल्या रस्त्यावर तसेच चिखल होतो त्या रस्त्यावर मुरुम टाकण्यात यावा अशी मागणी केली नगरपंचायतचे हद्दीत रस्त्यांवर अनिधिकृत अतिक्रमण करून रस्ते अरुंद केल्याने रहदारीला अडथळे येतात तसेच पुर्ण अतिक्रमण न काढता रस्त्याला अडथळा येणारे अतिक्रमण बाबत त्यांना सुचना केली आहे नगरपंचायतचे माध्यमातून जनतेची विकासात्मक व रचनात्मक कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू तुम्ही सहा महिने अवधी द्या हळूहळू विकास कामे मार्गी लावू अशी माहिती मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांनी दिली आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button