श्रीपूर मधील धोकादायक ट्रान्सफॉर्मर येथून हलविण्याची मागणी
श्रीपूर मधील धोकादायक ट्रान्सफॉर्मर येथून हलविण्याची मागणी
श्रीपुर (प्रतिनिधी)
श्रीपूर मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक नजिक असलेला ट्रान्सफॉर्मर तेथून हलविण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून केली आहे परंतु श्रीपूर विद्युत वितरण कंपनी चे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत कदाचित ते या भागात आणखी मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत का अशी शंका व्यक्त केली जात आहेΤ
गेल्या मे महिन्यात रात्री साडे आठ वाजता या ट्रान्सफॉर्मर ला अचानक आग लागली होती आजूबाजूला दुकाने आहेत तसेच येथूनच श्रीपूर बोरगाव नेवरे माळखांबी महाळुंग परिसरातील नागरिकांचा रहदारीचा मुख्य रस्ता आहे सुदैवाने कोणती अनिष्ट घटना घडली नाही मात्र नागरिकांनी एकत्रित येत पाणी टाकून आग विझवली होती त्यानंतर येथील नागरिकांनी कार्यकर्त्यांनी श्रीपूर विद्युत वितरण कंपनीचे संबंधित अधिकाऱ्यांना हा धोकादायक ट्रान्सफॉर्मर येथून अन्यत्र हलविण्याची विनंती केली होती तेव्हा पंधरा दिवसांत हा धोकादायक ट्रान्सफॉर्मर अन्यत्र ठिकाणी नेला जाईल असे आश्वासन दिले होते पाच महिने कालावधी होऊनही अद्याप विद्युत वितरण कंपनी चे अधिकारी यांनी तो ट्रान्सफॉर्मर हलवला नाही.