नगरपंचायतने पथदिवे बसवण्याची मागणी
श्रीपूर शहीद निवृत्ती जाधव प्रवेशद्वार ते यमाईनगर पर्यंत रस्त्यावर नगरपंचायतने पथदिवे बसवण्याची मागणी
श्रीपूर — प्रतिनिधी
श्रीपूर येथील शहीद निवृत्ती जाधव प्रवेशद्वार ते यमाईनगर पर्यंत रस्त्यावर पथदिवे नसल्याने संध्याकाळी या मार्गावर अंधार असतो पायी चालत जाणारे नागरिकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना अंधारामुळे अडचणींचा सामना करावा लागतो संध्याकाळी साडेसात नंतर या मार्गावर येथील रहिवाश्यांना रस्त्यानं चालणं धोकादायक ठरत आहे या परिसरातील सर्व रहिवासी तसेच परिसरातील नागरिकांनी महाळुंग श्रीपूर नगरपंचायतचे माध्यमातून या मार्गावर पथदिवे बसवून सहकार्य करावे अशी मागणी होत आहे या संदर्भात या मार्गावरील रहिवासी यांचे वतीने दोनशे नागरिकांच्या सह्या असलेलं निवेदन नगरपंचायतला देण्यात येणार आहे गेल्या काही महिन्यांत संध्याकाळी ज्येष्ठ महिला फिरायला जात असताना अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा गैरफायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पोबारा केला होता या मार्गावर विद्यार्थी काही युवक संध्याकाळी व्यायाम जिम साठी जातात त्यांनाही अंधारामुळे चालणे धोक्याचे आहे या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी नगरपंचायतीने लवकरात लवकर पथदिवे बसवून सहकार्य करावे अशी मागणी केली आहे या भागातील संबंधित स्थानिक नगरसेवक नगरसेविका यांनीही विशेष लक्ष घालून पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली आहे