उघड्या गटारीमुळे घाण पाणी नागरिकांच्या घरासमोर
श्रीपूर गणेशनगर धुमाळ वसाहतीत उघड्या गटारी मुळे संपूर्ण घाण पाणी नागरिकांच्या घरासमोर
वारंवार निवेदन तक्रार नगरपंचायतला देऊनही कसलीही दखल घेतली जात नाही
श्रीपूर(बी.टी.शिवशरण ज्येष्ठ पत्रकार)
श्रीपूर गणेशनगर धुमाळ वसाहतीत श्रीपूर मधील संपूर्ण परिसरातील कारखाना वसाहत विविध दवाखाने सर्व्हिसिंग सेंटर तसेच संडास बाथरुम याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर धुमाळ वसाहतीत उघड्या गटारी मुळे नाल्यातून कारखान्याचे जवळील नाल्यांमध्ये जात असून ते सांडपाणी मिरे बंधारा नदीकडे जाते या घाण पाण्यामुळे या परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली आहे नागरिक वारंवार आजारी पडत आहेत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या परिसरातील नागरिक डेंग्यू चिकुनगुनिया मलेरिया या आजाराने बेजार झाले आहेत लहान मुलांना सतत ताप खोकला वाढत आहे नागरिकांच्या घरासमोर उघड्यावर हे दुर्गंधीयुक्त पाणी वहात आहे या संदर्भात महाळुंग श्रीपूर नगरपंचायत कडे अनेकदा तक्रार केली अर्ज निवेदन दिले परंतु कसलीही दखल घेतली जात नाही असा आरोप येथे रहात असलेल्या पंचवीस ते तीस नागरिकांनी लेखी तक्रार वजा निवेदन अर्ज मार्च दोन हजार चोवीस मध्ये दिलेला आहे
पण नगरपंचायतीने कसलीही दखल घेतली नाही गेल्या वर्षी या परिसरातील नवविवाहित तरुणीला डेंग्यू झाला होता उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला आहे सदर बाब अत्यंत गंभीर असून देखील नगरपंचायत नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप येथील रहिवासी करत आहेत सदर वसाहत तेरा नंबर वार्डात येते या वार्डाचे नगरसेवक नगरपंचायतचे विद्यमान उपनगराध्यक्ष आहेत नगरपंचायतीची सत्ता उपनगराध्यक्ष यांचे नेतृत्वाखाली कार्यरत आहे नगरपंचायतला आता पर्यंत सहा मुख्याधिकारी झाले आहेत त्यांच्या कडे वारंवार पाठपुरावा केला आहे मात्र जाणून बुजून दखल घेतली जात नसल्याचे रहिवाशांनी सांगितले या भागातील उघडी असलेली गटार भुमीगत गटार बांधून सहकार्य करावे अन्यथा या वसाहतीतील सर्व रहिवासी आपल्या मुलाबाळांना घेऊन एक दिवस नगरपंचायतचे समोर धरणे आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला आहे उघड्या असलेल्या गटारीच्या पाण्यात मोठ्या अळ्या झाल्या आहेत त्या अळ्या नागरिकांच्या दारात घरात येत आहेत तसेच उघड्या गटारी मुळे दुर्गंधीचा सामना रोजचं करावा लागत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.