अँड.प्रकाशराव पाटील यांना मराठा भूषण पुरस्कार
अँड प्रकाशराव पाटील यांना मराठा भूषण पुरस्कार
श्रीपूर(बी.टी.शिवशरण जेष्ठ पत्रकार)
मराठा सेवा संघ यांच्या तीने मराठा समाजासाठी आपले कर्तृत्व योगदान देऊन सामाजिक लढ्याचे नेतृत्व केले बद्दल बोरगावचे अँड प्रकाशराव पाटील यांना मराठा भूषण पुरस्कार मिळाला आहे रवीवारी आठ सप्टेंबर रोजी अकलूज येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित रहाणार आहेत माढा लोकसभा मतदारसंघांचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे या कार्यक्रमाला अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मदनसिंह मोहिते पाटील शिव रत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील माजी सरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने शेंडगे मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष रवींद्र पवार अध्यक्ष निनाद पाटील कार्याध्यक्ष डॉ अमोल माने सचिव राजेंद्र मिसाळ बाळासाहेब पराडे पाटील संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ आदी उपस्थित रहाणार आहेत
अँड प्रकाशराव पाटील हे माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ विधीज्ञ आहेत तसेच ते उत्कृष्ट वक्ते मुत्सद्दी राजकारणी आहेत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद माजी सदस्य माळशिरस पंचायत समिती माजी उपाध्यक्ष सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा चेअरमन तसेच विद्यमान संचालक तसेच अनेक सामाजिक सहकारी संस्थांचे मार्गदर्शक राहिले आहेत सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक वैचारिक चळवळीत त्यांचा सहभाग राहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी भाषणं केली आहेत ते अभ्यासू नेते उत्तम वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत माळशिरस तालुक्यात त्यांचे घराणे मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते ते आता रणजितसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पर्यंत चौथ्या पिढीतील ते निष्ठावंत घराणे व नेतृत्व आहे अँड प्रकाशराव पाटील अत्यंत संयमी सोशीक म्हणून ओळखले जातात पण वेळप्रसंगी ते तितकेच कठोरपणे संघर्षमय जिवनात आक्रमक लढाऊ नेते आहेत स्वर्गीय मोहनराव पाटील यांचे पश्चात पाटील परिवार एकसंध ठेवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे माळशिरस तालुक्यात सर्व संघटना पक्ष नेते कार्यकर्ते यांचे पाटील यांच्याशी जिव्हाळ्याचे व सलोख्याचे संबंध आहेत त्यांना मराठा भूषण पुरस्कार मिळाले बद्दल माळशिरस तालुक्यात त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे