solapur

बातमीचा परिणाम श्रीपुर गणेशनगर धुमाळ वसाहतीत भूमिगत गटारीचे काम तातडीने सुरु

बातमीचा परिणाम

श्रीपूर गणेशनगर धुमाळ वसाहतीत भुमीगत गटारीचे काम तातडीने सुरू

गटारीचे कामानिमित्ताने नगरपंचायतचे दोन्ही गटांचे नेते कामकाज शुभारंभ प्रसंगी उपस्थित

श्रीपूर(बी.टी.शिवशरण जेष्ठ पत्रकार)

  • काल संध्याकाळी मी सोशल मीडिया वर श्रीपूर गणेशनगर धुमाळ वसाहतीतील उघड्या गटारी मुळे तेथील रहिवाशांना किती त्रास सहन करावा लागतो नगरपंचायत दखल घेत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी अशा आशयाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली होती त्या बातमीची त्वरित दखल माढा मतदारसंघांचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी घेतली त्यांनी महाळु़ंग श्रीपूर नगरपंचायतचे गटनेते राहुल अप्पा रेडे पाटील यांना फोन करून विचारले आमदार बबनराव शिंदे यांच्या आमदार निधीतून नगरपंचायतला निधी दिला आहे त्यामुळे लोकांची कामं काम का होत नाहीत आज सकाळी राहुल अप्पा रेडे पाटील यांनी बोलाऊन समक्ष चर्चा केली महाळुंग श्रीपूर नगरपंचायत वार्ड क्रमांक तेरा मध्ये विद्यमान नगरसेवक व उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांना सदर भुमीगत गटार बांधकाम करण्यासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपये मंजूर केले आहेत त्या कामाची वर्क ऑर्डर आहे परंतु काम सुरू करण्यास विलंब होत होता तेथील रहिवासी लखन धुमाळ व रहिवाशांनी काल मला एक लेखी निवेदन दिले होते त्या संदर्भात बातमी सोशल मीडिया वर व्हायरल झाली बातमीची दखल घेऊन आज सकाळी या भागातील उघडी गटार भुमीगत गटार करण्याचे काम सुरू केले सदर काम सुरू करण्यास जेसीबी आणून त्याचे कामाचे पूजन उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील नगराध्यक्षा पती अशोक चव्हाण नगरपंचायतचे गटनेते राहुल अप्पा रेडे पाटील माजी सरपंच लक्ष्मण आतार आर्किटेक्ट इंजिनिअर साळुंखे साहेब महाळुंगचे नेते रावसाहेब रेडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मौला पठाण नगरसेविका पती विक्रमसिंह लाटे तेजस रेडे पाटील अमर पिसाळ देशमुख माजी चेअरमन दादासाहेब लाटे विजय काकडे झगडे काका दादा जाधव संजय सुरवसे लखन धुमाळ बापूसाहेब मोकाशी इत्यादी उपस्थित होते गेली अनेक महिने उघडी गटार होती त्यामुळे सांडपाणी घाण पाणी उघड्या गटारीतून वहात असल्याने सगळीकडे डास वाढले होते नागरिक डेंग्यू चिकुनगुनिया मलेरिया ने त्रस्त होते याची माहिती देताना गटनेते राहुल अप्पा रेडे पाटील यांनी सांगितले की महाळुंग श्रीपूर नगरपंचायतला आमदार बबनदादा शिंदे यांनी आमदार निधी तीन टप्प्यांत दिला आहे जवळपास बावीस कोटी निधी विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला आहे त्यानुसार वार्डातील रस्त्यांची गटारीची कामे करण्यासाठी त्या त्या वार्डातील संबंधित नगरसेवक यांनी सुचवलेल्या कामांना प्राधान्य देऊन काम मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे नगरपंचायतला आमदार बबनदादा शिंदे यांचे माध्यमातून निधी उपलब्ध होत असल्याने रेंगाळलेली विकास कामे सुरू करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे गटारीच्या कामकाजास सुरू केल्या बद्दल येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button