महात्मा गांधी यांची हत्या आणि श्रीपुर मध्ये ब्राह्मण समाजाला दिलेलं संरक्षण
महात्मा गांधी यांची हत्या आणि श्रीपूर मध्ये ब्राम्हण समाजाला दिलेलं संरक्षण
पिराजी बाबर यांनी एकट्याने अर्धा तास लाठी काठी फिरवून दंगेखोराना पिटाळून लावले
श्रीपूर(बी.टी.शिवशरण ज्येष्ठ पत्रकार)
इतिहास हा आठवणी माहिती सत्य वस्तुस्थिती मांडल्याने त्याचे महत्व व येणार्या पिढीला मार्गदर्शक प्रेरणादायी ठरतो महात्मा गांधी यांची माथेफिरू नथुराम गोडसे याने महात्मा गांधी प्रार्थनेसाठी जात असताना भ्याड पणे गोळ्या घालून त्यांची हत्या केली आणि त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण भारतभर उमटले जाळपोळ दंगल मोर्चे आंदोलन यांनी देशात असंतोष निर्माण झाला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात श्रीपूर येथील दी बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लि कंपनी या कंपनीत बहुतांश अधिकारी कामगार शाळा मास्तर हे ब्राम्हण समाजातील होते ही बाब लक्षात घेऊन अकलूज येथील कांग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते व शेकडो नागरिक यांना घेऊन त्यांनी चार ते पाच ट्रक मधून श्रीपूर गाठले व ब्राम्हण समाजाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने त्यांचेवर चाल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीपूर महाळुंग बोरगाव परिसरातील बहुजन व मराठा दलित समाजातील नागरिकांनी ब्राम्हण समाजाला संरक्षण देण्यासाठी स्वतः रस्त्यावर येऊन दंगेखोरांना पिटाळून लावण्यासाठी निकराची झुंज दिली बोरगाव येथील रावसाहेब पाटील यांनी छातीचा कोट करून येथील अधिकारी कामगार यांना धीर दिला काहींना त्यांच्या वस्तीवर त्यांच्या सोसायटीच्या आफिस मध्ये लपवले अनेकांना शेतीच्या मळ्यात थांबवले त्यावेळी त्यांना चहा पाणी नाश्ता देण्याची व्यवस्था केली सध्या वाडी बंगला असलेल्या ठिकाणी पत्र्याचे मोठे शेड व कार्यालय होते तेथे ब्रम्हचारी नारायणकाका आगाशे रहात त्या ठिकाणाला काकांचा पत्रा असे संबोधले जायचे तेथे दलित समाजातील पिराजी बाबर हे पाण्याचे इंजिन सुरू करणे झाडांना पाणी देणं नारायण काकांना मदत करणं अशी कामं करत पिराजी बाबर हे काकांच्या पत्र्याचे समोर झाडांना पाणी देत होते तेव्हा काही दंगेखोर चाल करून येत असल्याचे त्यांनी पाहिले त्यावेळी बाजूला एक मोठी काठी पडली होती ती हातात घेतली व जोराने काठी फिरवायला सुरुवात केली अंगात रग मनगटात बळ व धाडसी व कठोर काळीज असलेल्या पिराजी बाबर यांनी मोठी आरोळी ठोकली व धीरगंभीर खणखणीत आवाजात समोरच्या दंगेखोराना इशारा दिला आल्या पावलांनी माघारी फिरा नाही तर एकेकाचा मुडदा पडेल अत्यंत चपळाईने विजेच्या गतीने पिराजी बाबर यांनी हातातील काठी फिरवायला सुरुवात केली समोरच्या दंगेखोरानी अंदाज घेतला हा आपल्याला सोडणार नाही तेव्हा महात्मा गांधी की जय अशा घोषणा देत ते दंगेखोर निघून गेले आतून नारायण काका आगाशे समक्ष डोळयाने पहात होते ते बाहेर आले व शाबास पिराजी म्हणून त्यांच्या पाठीवर थाप मारली तुझ्यामुळे आमचा जीव वाचला आमचे साहित्य दप्तर राहिले म्हणून बाबर यांना त्यांनी राणी छाप नाणी दिली तेथे उपस्थित असलेल्या अमृता पिसाळ यांना काकांनी आदेश दिला अमृता जा आतून दुधाचा तांब्या घेऊन ये तो दुधाने भरलेला तांब्या काकांनी पिराजी बाबर यांना दिला
*पिराजी बाबर हे अत्यंत महत्वाकांक्षी हुशार खंबीर व धाडसी व्यक्तीमत्व होते पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे दलित समाजावर तत्कालीन सवर्ण लोक अन्याय अत्याचार जुलुम छळ करत ही बाब पिराजी बाबर यांना खटकतं होती अन्यायाविरुद्ध लढण्याचे बंड त्यांच्या नसानसात भिनलेले असल्याने त्यावेळी त्यांनी दलित समाज एक केला व तेथील प्रस्थापित जातीवादी लोकांविरुद्ध बंड पुकारून त्यांना जशा स तसं उत्तर देणे सुरू केले हा प्रतिकार सहन न झाल्याने सगळा गाव एक झाला आजूबाजूच्या खेड्यातील गावांतील अनेक लोक दलित समाजाचे विरोधात एक झाला त्यात अल्प असलेल्या बाबर कुटुंबांवर शेकडो सवर्ण लोकांनी हल्ला केला त्यावेळी पिराजी बाबर व त्यांच्या काही साथीदारांनी सवर्णांच्या हल्ल्याला कडवी झुंज दिली त्यांनी केवळ मार खाल्ला नाही तर अनेकांना ठोकून काढले त्यात पिराजी बाबर व अनेक दलित समाजातील लोक यांना जायबंदी व्हावं लागलं अनेकांची डोकी फुटली हातपाय जायबंदी झाले तेव्हा एका रात्री संपूर्ण तेथील दलित समाजाने कौठाळी गाव सोडण्याचा निर्णय घेतला जखमी झालेल्या लोकांना सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हे अन्याय अत्याचार व जातीवादी प्रकरण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले विशेष म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली ते स्वतः सोलापूर येथे समक्ष येऊन जखमी लोकांची विचारपूस केली सदर जातीय अत्याचार घटनेची दखल शासनाने घेऊन जातीवादी दंगेखोर सवर्णांच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला निकाल झाला तेव्हा त्या लोकांना दोषी ठरवून शिक्षा झाली पिराजी बाबर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात हात घेऊन त्यांना नमस्कार केला त्यानंतर संपूर्ण दलित समाज हा श्रीपूर येथील साखर कारखान्यात नोकरीसाठी स्थानिक झाला **
थोडक्यात सांगायचे तर गांधी हत्या नंतर श्रीपूर मध्ये ब्राम्हण समाजाला संरक्षण व कारखान्याचे मालक यांना पिराजी बाबर यांनी प्रचंड ताकदीने हातातील काठी फिरवून दंगेखोरापासून संरक्षण देऊन वाचवलं हे आताच्या पिढीला ज्ञात असाव त्यानंतर पिराजी बाबर यांच्या पराक्रमाची माहिती नारायण काका यांनी वैकुंठवासी चंद्रशेखर आगाशे यांना सांगितली त्याचे बक्षीस म्हणून पिराजी बाबर यांना श्रीपूर कारखान्यात पाणी सोडणे इंजिन देखभाल करण्याची कायमस्वरूपी नोकरी दिली श्रीपूर वसाहतीत पाणी पुरवठा करणारी जी विहीर आहे त्या विहिरीला आजही संपूर्ण श्रीपूरकर बाबर विहीर म्हणून ओळखतात