solapur
माळीनगर येथे श्री गणेशाची प्रतिष्ठापना ज्येष्ठ पत्रकार मिलिंद गिरमे यांच्या शुभहस्ते संपन्न
माळीनगर येथे श्री गणेशाची प्रतिष्ठापना जेष्ठ पत्रकार मिलिंद गिरमे यांच्या शुभहस्ते संपन्न.
अकलूज (प्रतिनिधी)
माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी या साखर कारखान्याच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना कारखान्याचे जेष्ठ भागधारक व जेष्ठ पत्रकार मिलिंद मधुकरराव गिरमे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्मिता मिलिंद गिरमे या उभयतांचे हस्ते आज सकाळी दि मॉडेल विविधांगी प्रशालेच्या मैदानावरील श्री गणेशोत्सव या ठिकाणी विधीवत पूजा करून करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे, मॅनेजिंग डायरेक्टर सतीश आप्पा गिरमे,ज्येष्ठ भागधारक विजयराव नेवसे,इंडिपेंडंट डायरेक्टर राजीव देवकर,माजी प्राचार्य प्रकाश चवरे,उपप्राचार्य रितेश पांढरे, योगेश बोरावके तसेच कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख,अधिकारी वर्ग, कर्मचारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.