आयुष्यामध्ये मिळालेल्या संधीचे सोने केले तर उज्वल भवितव्य घडते; संजय लोहकरे
आयुष्यामध्ये मिळालेल्या संधीचे सोने केले तर उज्वल भवितव्य घडते;संजय लोहकरे.
संग्रामनगर (प्रतिनिधी)
अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ *डॉ.एम.के.इनामदार सर* यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल देश पातळीवर व परदेशात हि त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.पण माझी खूप दिवसापासून एक इच्छा होती की त्यांना मी काढलेला एक आकर्षक फोटो मोठा करून भेट देण्याची होती ती आज पुर्ण झाली.माझे पत्रकार क्षेत्रातील महागुरू शहाजहान आत्तार यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करून फोटो भेट देण्यात आला. माझ्यासाठी आजचा हा क्षण माझ्या जीवनात खूप विस्मरणीय ठरला आहे.
*देणा-याने देत जावे…*
*घेणा-याने घेत जावे…*
*घेता घेता एक दिवस…*
*देणा-याचे हात घ्यावे…!*
या *विंदा करंदीकर* यांच्या कवितेतील ओळी आठवल्या की मला कलाप्रेमी व दूरदृष्टी नेते *जयसिंह मोहिते-पाटील* व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री व सोलापूर लोकसभेचे माजी खासदार *स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील* यांच्या कार्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. मी गेली ३१ वर्ष पत्रकारिता व प्रेस फोटोग्राफरच्या क्षेत्रात काम करत असताना या दोन महान व्यक्तींच्या सान्निध्यात राहून मला खूप काही शिकायला व अनुभवयाला मिळाले आहे. आज त्यांच्या या अनुभवाच्या जोरावर मी सर्व ठिकाणी बिनधास्त व निर्भिडपणे वावरत आहे.
जीवनाच्या प्रवासामध्ये सर्वांना आपले भवितव्य घडविण्याची संधी मिळत असते. त्या संधीचा फायदा घेऊन जर सर्वांनी सोने केले तर एक माणूस म्हणून नावारूपाला येऊ शकतो.वेळप्रसंगी संघर्षाचा सामना करण्याचा आला तरी स्वतः मधील आत्मविश्वास गमावू नका.त्यातूनच आपले उज्वल भवितव्य घडते.मी स्वतः सर्वसामान्य घरातील माणूस होतो.माझ्या अंगी असलेल्या कलेला बळ व प्रोत्साहन देण्याचे काम बाळदादा व पप्पासाहेब यांनी केले.त्यामुळे मी अकलूज व माळशिरस तालुक्याला वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध देऊ शकलो.त्यासाठी संघर्ष ही खूप करावा लागला आहे.माझ्या व्यवसायाची सुरुवात एक छोटा व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय सुरू केला पुढे फोटोग्राफीच्या व्यवसायात पाऊल ठेवले.मला फक्त एकच छंद होता की आज काढलेला फोटो व बातमी उद्याच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालाच पाहिजे.त्यातूनच मी नावारूपाला आलो आहे.आज सोलापूर जिल्हात मला ओळखत नाही पण माझ्या नावाला सर्वजण ओळखतात.