solapur

अकलूज (माळेवाडी) येथील रस्त्यावर वाहणारे घाण पाणी झाले बंद   

अकलूज (माळेवाडी) येथील रस्त्यावर वाहणारे घाण पाणी झाले बंद   

संचारवृत्त बातमीचा इफेक्ट

संचार वृत्त अपडेट 

काल संचार वृत्त व बारामती झटका यूट्यूब ला भाजपचे सक्रिय कार्यकर्ते अमित टिळेकर ,लहू सुधाकर, संजय खुडे, नवनाथ साठे,लहू कांबळे ई. कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना बातमी दिली होती. बातमी प्रसिद्ध होताच अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी लगेच या कामाची दखल घेऊन आज स्वच्छतेचे आदेश काढून काम केले.सदरचे काम आज काही तासाच पुर्ण केले.त्यामुळे सचिन पाटील यांच्या कर्तव्यदक्ष व कार्यकुशल कामाची झलक माळेवाडीकरांना पहायला मिळाली.विद्यानगर येथील गटारीतील घाणीचे पाणी अकलूज वेळापूर रस्त्यावरून वहात होते. आज सकाळ पासून जेसीबी च्या सहाय्याने रस्त्यावर वहाणारे घाणपाणी बंद झाले आहे.
अकलूज नगरपरिषदेमध्ये माळेवाडी (अ) गावाचा चार वर्षापुर्वी समावेश करण्यात आला होता. त्यानंतर तेथील नागरिकांना कोणत्याच सुखसोयी व सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.ना गटारीची सोय,ना रस्त्यावर लाईट,ना गावामध्ये रस्ते चांगले आहेत.त्याच बरोबर भरमसाट घरपट्टी व त्यावर विविध प्रकारे व्याज आकारल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.माळेवाडीकरांना अकलूजच्या मानाने कुठल्याच सेवा व सुविधा नगरपरिषदेकडून उपलब्ध होत नाहीत.माळेवाडीतील आज गटारीतील रस्त्यावरील वहाणारे घाणपाणी बंद झाल्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. माळेवाडी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button