कृष्णा,जयवंत साखर कारखान्याची ३२००/- रुपयाची पहिली उचल जाहीर
कृष्णा,जयवंत साखर कारखान्याची ३२००/- रुपयाची पहिली उचल जाहीर
संचार वृत्त अपडेट
कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्स सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडत यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रति टन 3200 रुपयाची पहिली उचल जाहीर केली आहे रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने २०२४-२५ या ऊस गाळप हंगामासाठी येणाऱ्या उसाला प्रति टन 3200 रुपयाची पहिली उचल जाहीर केली त्याची घोषणा कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष व जयवंत शुगरचे संस्थापक डॉ सुरेश भोसले यांनी केली त्यामुळे जिल्ह्यातील रोजगाराची कोंडी फुटली आहे कारभार करणाऱ्या कृष्णा कारखान्याने व जयवंत शुगर्सने नेहमीच चांगला दर देऊन शेतकरी सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे यंदाचा गणित हंगाम निवडणुकीच्या धामधुमे मुळे उशिरा सुरू झाला अशावेळी सातारा जिल्ह्यात कोणता कारखाना उसाला किती दर देणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होतेय अशावेळी कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगरचने सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडत यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रति टन 3200 रुपयाची पहिली उचल जाहीर केली आहे कृष्णा कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामास 25 नोव्हेंबरला प्रारंभ झाला असून आज अखेर 17 दिवसात एक लाख 87 हजार 800 मेट्रिक टन गाळप झाले आहे एक लाख 81 हजार 60 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेण्यात आले आहे जयवंत शुगर्सच्या यंदाच्या गळीत हंगामासाठी 25 नोव्हेंबरला प्रारंभ झाला असून आज अखेर 17 दिवसात 94 हजार 200 मॅट्रिक टन गाळप झाले असून 77 हजार 650 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेण्यात आले आहे सर्व ऊस उत्पादक व सभासदांनी पिकवलेला सर्व ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे असे आव्हान कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे
उसाला एक रकमी 4000 रुपये द्या
जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सुरू झाले आहेत या हंगामातील ऊसाला एक रकमी चार हजार रुपये दर जाहीर करावा या मागणीचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार डॉ.अतुल भोसले यांना देण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास जाधव, युवा अध्यक्ष गणेश शेवाळे, तालुकाध्यक्ष आनंदराव थोरात,जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी,उपाध्यक्ष उत्तमराव खबाले, बाबासाहेब मोहिते, सागर कांबळे,शंभू पाटील,बळीराजा संघटनेचे कार्यकर्ते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले