सहकार महर्षी कारखान्याचा प्रति टन 2900/-दर जाहीर
सहकार महर्षी कारखान्याचा प्रति टन 2900/-दर जाहीर
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर(केदार लोहकरे)शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा २०२४-२५ चा सिझन दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू झालेला आहे.सदर सिझनमध्ये गाळपास आलेल्या व येणा-या ऊसाकरीता प्रथम ॲडव्हान्स रक्कम रुपये २,६००/- व पोळा सणाकरीता रक्कम रुपये १००/- तसेच दिपावली सणाकरीता रक्कम रुपये २००/- प्रमाणे एकुण रक्कम रुपये २,९००/- प्रति मे.टन ऊस दर देण्यात येणार आहे.तसेच माहे- फेब्रुवारी २०२५ पासून पुढे गाळपास येणा-या ऊसाकरीता प्रति मे.टन रक्कम रु.१००/- अनुदान जाहीर करणेत येत असून ते दिपावली सणाचे बिलाबरोबर आदा करणेत येणार असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिली.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.कारखान्याचा सिझन २०२४-२५ चा ऊस गळीत हंगाम दि. १५ नोव्हेंबर २०२४रोजी सुरु झाला असून दि.13 डिसेंबर २०२४ अखेर २ लाख ३६ हजार ७७७ मे.टन ऊसाचे गाळप होऊन २ लाख १० हजार ९५० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले असून सरासरी साखर उतारा ९.४९ % आहे. सध्या प्रति दिवस ८,५०० मे.टन याप्रमाणे ऊसाचे गाळप होत आहे.
चालू सिझन २०२४-२५ मध्ये को-जन वीज निर्मिती प्रकल्प दिनांक ७ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरु झाला असून दि.१३ डिसेंबर २०२४ अखेर २ कोटी ०९ लाख ०३ हजार ४९० युनीट वीज निर्माण झाली असून त्यामधुन १ लाख २८ लाख ५१ हजार ९१४ युनिट वीज विक्री केलेली आहे.
तसेच उपपदार्थ प्रकल्प डिस्टीलरीमध्ये दि.१३ डिसेंबर २०२४ अखेर ३३ लाख ९० हजार ४३२ लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट तसेच ३० लाख ६४ हजार ९२६ लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
सदर प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते-पाटील माजी उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य, व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख,संचालिका कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील, तसेच संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे,नानासाहेब मुंडफणे,विजय पवार, रावसाहेब मगर,संग्रामसिंह जहागिरदार,रामचंद्र सिद,विराज निंबाळकर,रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर,भिमराव काळे,अमरदिप काळकुटे,गोविंद पवार,सुभाष कटके,जयदिप एकतपुरे,रामचंद्र ठवरे,तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे,बाळासाहेब माने-देशमुख,कालीदास मिसाळ, दत्तात्रय चव्हाण,विनायक केचे, राजेंद्र भोसले,अमृतराज माने-देशमुख,धनंजय सावंत, नामदेव चव्हाण,धनंजय दुपडे, अनिलराव कोकाटे,श्रीकांत बोडके,सौ.हर्षाली निंबाळकर, श्रीमती पुष्पा महाडीक उपस्थित होते.