आशा लोंढे यांचा आरपीआय चे वतीने सत्कार
आशा लोंढे यांचा आरपीआय चे वतीने सत्कार
श्रीपूर(संचारवृत्त सेवा)
श्रीपूर येथील आशा रमेश लोंढे हीची पुणे सिटी पोलिस दलात ओपन जागेवर पोलिस म्हणून निवड झाली आहे तिच्या निवडीबद्दल आज आरपीआय आठवले गट यांचे वतीने आरपीआय सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे तालुका उपाध्यक्ष संजय भोसले ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण शहर अध्यक्ष गणेश सावंत शहर सरचिटणीस विश्वजीत भालशंकर उपाध्यक्ष रमेश भोसले अमोल बनसोडे लखन कारंडे प्रथमेश लोंढे इत्यादी उपस्थित होते यावेळी आशा लोंढे हीचे आईवडील रमेश लोंढे व सौ सिमा लोंढे यांचाही आरपीआय चे वतीने सत्कार करण्यात आला तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी शुभेच्छा देताना म्हटले की समाजातील प्रत्येक तरुण तरुणी यांनी आपल्या उराशी ध्येय बाळगून शासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच मोबाईल चा वापर गरजेपुरता वापरून त्याचा वारंवार विनाकारण वापर करून अभ्यास व्यायाम वाचन याकडे दुर्लक्ष करू नये निर्व्यसनी राहिले पाहिजे आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज झाले पाहिजे शिक्षण घेऊन प्रगती करा आशा लोंढे यांच्या प्रमाणे सर्व युवक युवती यांनी जिद्द मेहनत करून अभ्यास करून प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे यावेळी तीच्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज केल्याबद्दल तीला सर्वांनी शुभेच्छा दिल्या