भुयारी गटार व सिमेंट रोड कामांचे भूमिपूजन
प्रभाग क्रमांक बारा मध्ये जमदाडे प्लांट मध्ये भुयारी गटार व सिमेंट रोड कामांचे भूमिपूजन
श्रीपूर(बी.टी.शिवशरण जेष्ठ पत्रकार)
आज महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक बारा मध्ये जमदाडे प्लांट येथे सुमारे पंचवीस लाख रुपयांची भुयारी गटार व सिमेंट रस्त्याचे कामांचे भूमिपूजन नगराध्यक्षा सौ लक्ष्मी चव्हाण व ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गटनेते राहुल अप्पा रेडे पाटील नगरसेविका सौ तेजश्री लाटे नगरसेवक प्रकाश नवगिरे ज्येष्ठ नेते मौला पठाण भाऊसाहेब कुलकर्णी रावसाहेब सावंत पाटील माजी सरपंच लक्ष्मण आतार पैलवान अशोक चव्हाण सेवानिवृत् बँक मॅनेजर वगरे साहेब पांडुरंग गोरे विक्रमसिंह लाटे आबा रजपूत विपिन वगरे योगेश जोशी इत्यादी उपस्थित होते यावेळी महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये विविध विकास कामांसाठी आमदार बबनदादा शिंदे यांचे माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन घेऊन प्रभागातील रस्ते गटारी व इतर कामे करु अशी माहिती गटनेते राहुल अप्पा रेडे पाटील यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नगरसेविका यांच्या सर्व वार्डातील विकास कामे सुरू असून कोणतीही नागरिकांनी सुचविले तर ती पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती ज्येष्ठ नेते मौला पठाण यांनी दिली या भागातील विकास कामांसाठी आमदार बबनदादा शिंदे यांचे माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे अजून वाढीव निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही ते म्हणाले.